ETV Bharat / sports

Eoin Morgan Retirement : इंग्लडचा विश्वकप विजेता कर्णधार इऑन मॉर्गनची क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती - Englands World Cup Winning Captain Eoin Morgan

इंग्लंडचा स्टार क्रिकेटर आणि कर्णधार इऑन मॉर्गन याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. इंग्लडला पहिला विश्वकप देणारा हा स्टार महान कर्णधार इऑन मॉर्गन याने क्रिकेटच्या सर्व फाॅरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चर्चेचा विषय ठरला आहे. पाहुया यावरील सविस्तर रिपोर्ट....

Eoin Morgan retirement
इंग्लडचा विश्वकप विजेता कर्णधार इऑन मॉर्गनची क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती
author img

By

Published : Feb 13, 2023, 4:39 PM IST

नवी दिल्ली : इंग्लंडचा स्टार क्रिकेटर इऑन मॉर्गन याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मॉर्गनच्या या निर्णयामुळे 2006 मध्ये सुरू झालेली त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही आता संपली आहे. मॉर्गनने आपल्या या प्रवासाची आठवण करून सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. 2019 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड क्रिकेट संघाचा तो कर्णधार होता.

मॉर्गनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी : मॉर्गनने 16 कसोटीत 30.43 च्या सरासरीने 700 धावा केल्या. 248 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 39.29 च्या सरासरीने आणि 91.16 च्या स्ट्राइक रेटने 7,701 धावा केल्या. त्याचा उच्चांक 148 आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने 14 शतके आणि 47 अर्धशतके केली आहेत. 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या 28.58 च्या सरासरीने 2,458 धावा आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 14 अर्धशतके आहेत.

मॉर्गन एक उत्कृष्ट फलंदाज : मॉर्गन त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जात होता. त्याने प्रदीर्घ काळ इंग्लंड संघाची कमानही सांभाळली. इंग्लंड संघापूर्वी मॉर्गन आयर्लंड संघाकडून खेळत असे. मात्र, त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे इंग्लंड संघाने त्याचा आपल्या संघात समावेश केला. इंग्लंडचा स्टार क्रिकेटर इऑन मॉर्गन याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

इंग्लडला मिळवून दिला विश्वचषक : क्रिकेटची सुरुवात ज्या देशाने केली, अशा देशाचा विचार केल्यास इंग्लंडचा नाव सर्वात आधी घेतले जाते. पण असे असूनही क्रिकेट विश्वचषक सुरू होऊनही कित्येक वर्षे इंग्लंडला विश्वचषक जिंकता आला नाही. पण, ही अद्भुत कामगिरी इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने 2019 साली करून दाखवली. न्यूझीलंड संघाला अंतिम सामन्यात मात देत इंग्लंडने हा विश्वचषक जिंकला होता. पण, मॉर्गन लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता त्याने निवृत्ती जाहीर केल्याची अधिकृत माहिती आयसीसीने दिली आहे.

इऑन मॉर्गनने 16 वर्षांनंतर घेतली निवृत्ती : आंतरराष्ट्रीय सामन्यांत 2006 साली पदार्पण करणाऱ्या इऑन मॉर्गनने 16 वर्षांनंतर निवृत्ती घेतली आहे. आधी 2006 ते 2009 आयर्लंडसाठी क्रिकेट खेळलेल्या मॉर्गनने पुढील सर्व वर्षे इंग्लंडसाठी क्रिकेट खेळला. 35 वर्षीय मॉर्गन मर्यादीत षटकांतील उत्तम कर्णधार असण्यासह इंग्लंडकडून धावा करण्यातही आघाडीवर होता. त्याने इंग्लंडकडून 225 एकदिवसीय सामन्यात 13 शतकांसह 6 हजार 957 धावा ठोकल्या.

इंग्लडला पहिला विश्वकप देणारा स्टार कर्णधार : आयर्लंड आणि इंग्लंडकडून मिळून 7 हजार 701 धावा 14 शतकांसह केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने 126 सामन्यात इंग्लंडचे नेतृत्त्व करीत 76 सामने संघाला जिंकवून दिले. त्यामुळे 5.25 हा त्याची सामने जिंकण्याची सरासरी ठरली. यामध्ये 2019 साली त्याने संघाला मिळवून दिलेला पहिला वहिला एकदिवसीय विश्वचषक महत्त्वाचा ठरला.

हेही वाचा : Women IPL Auction 2023 : भारताची स्मृती मानधना ठरली सर्वात महागडी क्रिकेट खेळाडू; स्मृतीला राॅयल चॅलेंजर्सने 3.4 कोटींना केले खरेदी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.