ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022: इंग्लंडची अमेरिकेशी कडवी झुंज; सामना अनिर्णित राहिल्याने पुढील फेरीची शर्यत ठरणार रंजक - England vs USA

FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषकात इंग्लंड आणि अमेरिका यांच्यात निकराची लढत झाली. दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही आणि सामना अनिर्णित राहिला आहे.

England vs USA
England vs USA
author img

By

Published : Nov 26, 2022, 10:25 AM IST

दोहा: फिफा विश्वचषक 2022 मध्ये इंग्लंड आणि अमेरिका (England vs USA) यांच्यात निकराची लढत झाली. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांपैकी एकही गोल करू शकला नाही, आणि सामना अनिर्णित राहिला. ब गटातील हा सामना शनिवारी अल बायत स्टेडियमवर खेळला गेला आहे. सामना अनिर्णित राहिल्यानंतर इंग्लंड गट क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडने 2 पैकी 1 सामना जिंकला असून बरोबरीत 4 गुण आहेत.

यासोबतच अमेरिका 2 ड्रॉमधून 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सामन्यातील सर्वोत्तम संधी वेस्टन मॅकेनीला आली, पण तोही गोल करण्यात अपयशी ठरला. इंग्लंड आणि अमेरिका यांच्यात एकूण 11 सामने झाले आहेत. यातील आठ सामने इंग्लंडने आणि दोन अमेरिकेने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. फिफा क्रमवारीतही इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे. तर अमेरिका 16 व्या स्थानावर आहे. FIFA World Cup 2022 मध्ये इराणविरुद्धच्या त्यांच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने सहा गोल केले, परंतु या सामन्यात त्यांच्या एकाही खेळाडूला गोल करता आला नाही.

अमेरिकेची आशा 22 वर्षीय युवा फॉरवर्ड टीम वेहवर होती, पण त्यालाही गोल करता आला नाही. वेल्सविरुद्धच्या शेवटच्या 1-1 अशा बरोबरीत व्हियाने गोल केला होता. त्याने सलामीचा गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्याने अमेरिकेसाठी 26 सामन्यांत 4 गोल केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.