मुंबई - भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकत इतिहास रचला. वेटलिफ्टिंगमध्ये चानूने भारताचा 21 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. चानू 49 किलो वजनी गटात हा कारनामा केला.
मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी ही कामगिरी केली. तिने स्नॅच आणि क्लिन अॅण्ड जर्क फेरीत मिळून एकूण 202 किलो वजन उचलत पदकाला गवसणी घातली. या कामगिरीनंतर चानूवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षांव होत आहे.
सर्वसामन्यांपासून नामांकित मान्यवर मीराबाईचे कौतुक करत आहेत. अनेक सरकारी आणि खासगी संस्थांनी तर मीराबाई चानूला बक्षिसाची घोषणा देखील केली आहे. या यादीत एका पिझ्झा कंपनीची भर पडली आहे.
एका नामांकित पिझ्झा कंपनीने मीराबाई चानूला आयुष्यभर पिझ्झा मोफत देण्याची घोषणा केली आहे. पिझ्झा कंपनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर यांची घोषणा केली.
यात पिझ्झा कंपनीने लिहलं की, 'त्यांनी सांगितलं आणि आम्ही ऐकलं. आम्ही कधीही विचार करु शकत नाही की, मीराबाई चानूला पिझ्झा खाण्यासाठी वाट पाहावी लागेल. यामुळे आम्ही त्यांना आयुष्यभर मोफत पिझ्झा पुरवणार आहोत.'
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मीराबाई चानूने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होत की, 'मी पिझ्झा खाऊ इच्छित आहे. त्यासाठी मी खूप काळापासून वाट पाहात आहे.'
पिझ्झा कंपनीने मीराबाई चानूची इच्छा ओळखून तिला आयुष्यभर मोफत पिझ्झा देण्याचा निर्णय घेतला. पिझ्झा कंपनीच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर नेटीझन्स स्वागत करत आहेत.
हेही वाचा - Tokyo Olympics : पिस्तूलने मनु भाकरला दिला दगा, पदकाचे स्वप्न भंगले
हेही वाचा - Tokyo Olympics: पी. व्ही. सिंधूचा विजयी श्रीगणेशा