पॅरिस - दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कोमलिका बारी या भारतीय महिला रिकर्व संघाने आज रविवारी विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात मेक्सिकोचा ५-१ असा एकतर्फा धुव्वा उडवला. याआधी शनिवारी कंपाउंड वैयक्तिक स्पर्धेत अभिषेक वर्नाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते.
विश्व तिरंदाजीच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन भारतीय संघाविषयी माहिती देण्यात आली. यात त्यांनी म्हटलं आहे की, भारतीय संघाने पॅरिसमध्ये सुवर्णपदक जिंकले. पॅरिसमध्ये विश्वचषक स्टेज ३ च्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पण ही स्पर्धा ऑलिम्पिकच्या क्वालिफायसाठी नव्हती.
-
India 🇮🇳 takes gold in Paris! 🥇🏹👏 #ArcheryWorldCup pic.twitter.com/punkObEOAq
— World Archery (@worldarchery) June 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">India 🇮🇳 takes gold in Paris! 🥇🏹👏 #ArcheryWorldCup pic.twitter.com/punkObEOAq
— World Archery (@worldarchery) June 27, 2021India 🇮🇳 takes gold in Paris! 🥇🏹👏 #ArcheryWorldCup pic.twitter.com/punkObEOAq
— World Archery (@worldarchery) June 27, 2021
दरम्यान, भारतीय तिरंदाजी संघाला टोकियो ऑलिम्पिकचे तिकिट मिळवण्यात अपयश आले होते. या महिन्याच्या सुरूवातीला टोकियो ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होण्यासाठी आवश्यक असणारी अखेरची स्पर्धा पार पडली. यात भारतीय संघ पहिल्या फेरीत पराभूत झाला होता. परंतु, आजच्या विजयाने भारतीय संघाचे खचलेले मनोबल वाढलं आहे.
हेही वाचा - विराट कोहलीचा 'चमचा' म्हटल्यावर भडकला इरफान पठाण, पलटून विचारला जबराट प्रश्न
हेही वाचा - Tokyo Olympics : साजन प्रकाशने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला जलतरणपटू