नवी दिल्ली : डेविस कप वर्ल्ड ( Davis Cup World ) ग्रुप प्लेऑफ 1 टाईमध्ये रामकुमार रामनाथनने शुक्रवारी दिल्ली जिमखाना क्लबमध्ये पहिल्या एकेरीच्या लढतीत भारताने डेन्मार्कच्या क्रिश्चियन सिग्सगार्डचा 6-3, 6-2 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. त्याचबरोबर भारताने 1-0 अशी आघाडी ( India lead 1-0 against Denmark ) घेतली.
-
Ramkumar Ramanathan put India 1-0 ahead in the Davis Cup World Group I Play-off tie against Denmark as he walked out with an easy straight-set win over an error-prone Christian Sigsgaard on Friday. #Tennis #DavisCup https://t.co/R0pnr8CNYh
— Sportstar (@sportstarweb) March 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ramkumar Ramanathan put India 1-0 ahead in the Davis Cup World Group I Play-off tie against Denmark as he walked out with an easy straight-set win over an error-prone Christian Sigsgaard on Friday. #Tennis #DavisCup https://t.co/R0pnr8CNYh
— Sportstar (@sportstarweb) March 4, 2022Ramkumar Ramanathan put India 1-0 ahead in the Davis Cup World Group I Play-off tie against Denmark as he walked out with an easy straight-set win over an error-prone Christian Sigsgaard on Friday. #Tennis #DavisCup https://t.co/R0pnr8CNYh
— Sportstar (@sportstarweb) March 4, 2022
जागतिक क्रमवारीत 170व्या स्थानी असलेला रामकुमार पहिल्या गेमपासूनच सर्वोत्तम प्रदर्शन करत खेळत होता. त्याने आपल्या 24 वर्षीय प्रतिस्पर्ध्याच्या सर्व्हिसला नियमितपणे प्रतिसाद दिला आणि सहजतेने गुण मिळवले.
27 वर्षीय रामकुमारने सुरुवातीपासूनच जगातील 824 व्या क्रमांकावरील क्रिश्चियनवर दबाव टाकला होता. त्याने काही वेळात 5-2 अशी आघाडी घेतली आणि सुंदर रचलेल्या बॅकहँड स्ट्रोकने पहिला सेट जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपली सर्व्हिस कायम ठेवली. पण क्रिस्टियनने सामन्यात पुनरागमन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र रामकुमारने त्याला कोणतीही संधी दिली नाही. तसेच चमकदार कामगिरी करत हा सेट सुद्धा त्याने आपल्या नावे केला.