ETV Bharat / sports

CWG 2022 : कुस्तीमध्ये भारताची गोल्डन हॅटट्रीक; दीपक पुनियाने 86 किलो वजनी गटात पटकावले सुवर्णपदक

कुस्तीपटू दीपक पुनियाने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये त्याने फ्रीस्टाइल 86 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले ( Deepak Punia won gold medal in wrestling ). तसेच आता भारतीय संघाने 26 पदकांची कमाई केली होती. यामध्ये 9 सुवर्णपदक, आणि आठ रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे.

Wrestler Deepak Punia
कुस्तीपटू दीपक पुनिया
author img

By

Published : Aug 6, 2022, 12:11 PM IST

बर्मिंगहॅम: भारताचा कुस्तीपटू दीपक पुनियाने ( Wrestler Deepak Punia ) बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये आतापर्यंतच्या सर्वात संस्मरणीय कामगिरीमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. त्याने फ्रीस्टाइल 86 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा पराभव ( Deepak Punia defeating a Pakistani wrestler ) केला. इनामविरुद्ध पुनियाने जबरदस्त कामगिरी केली. त्याने पाकिस्तानी कुस्तीपटूला वरचढ ठरण्याची एकही संधी दिली नाही.

दीपकने हा सामना 3-0 ने जिंकला. राष्ट्रकुल स्पर्धेतील दीपक पुनियाचे हे पहिले पदक ( Deepak Punia first Commonwealth Games medal )आहे. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 26 पदके जिंकली आहेत. यामध्ये नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे.

त्याचबरोबर भारताने कुस्तीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. प्रथम बजरंग पुनियाने ( Wrestler Bajrang Punia ) अंतिम फेरीत जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर देशाची कन्या साक्षी मलिकने ( Wrestler Sakshi Malik ) फ्रीस्टाइल 62 किलो गटात कॅनडाच्या अॅना गोडिनेझ गोन्झालेझचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. साक्षीने प्रथम विरोधी खेळाडूला फटकेबाजी करत चार गुण मिळवले. त्यानंतर पिनबॉलने जिंकले. साक्षीने यापूर्वी कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य (2014) आणि कांस्यपदक (2018) जिंकले होते.

भारताला आतापर्यंत इतकी पदके -

9 सुवर्ण - मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल टीम, टेबल टेनिस पुरुष टीम, सुधीर (पावर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, दीपक पुनिया आणि साक्षी मलिक.

8 रौप्य पदक - संकेत सरगरी, बिंदियारानी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन टीम, तुलिका मान, मुरली श्रीशंकर आणि अंशू मलिक.

9 कांस्य पदक - गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, आणि तेजस्विन शंकर.

हेही वाचा - Commonwealth Games 2022 : बजरंग पुनियाची गोल्डन कामगिरी; कुस्तीत मिळवले सुवर्ण पदक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.