बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मधून भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. मनिका बत्राने ( Table Tennis Player Manika Batra ) टेबल टेनिसमध्ये आपला पहिला सामना जिंकला आहे. मनिकाने पहिला गेम 11-5 असा जिंकला. त्याचवेळी दुसऱ्या गेममध्ये 11-3 आणि तिसऱ्या गेममध्ये 11-2 असा विजय मिळवला. त्याचवेळी, जलतरणपटू श्रीहरी नटराजने ( Swimmer Srihari Nataraj ) पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने हीट 4 मध्ये 54.68 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले.
-
#IND's🇮🇳 Manika Batra beat South Africa's Musfiquh Kalam 11-5, 11-3, 11-2.#TeamIndia lead 2-0 against South Africa!#Cheer4India | #CWG2022 | #B2022 pic.twitter.com/aDzWjNU1Bl
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#IND's🇮🇳 Manika Batra beat South Africa's Musfiquh Kalam 11-5, 11-3, 11-2.#TeamIndia lead 2-0 against South Africa!#Cheer4India | #CWG2022 | #B2022 pic.twitter.com/aDzWjNU1Bl
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 29, 2022#IND's🇮🇳 Manika Batra beat South Africa's Musfiquh Kalam 11-5, 11-3, 11-2.#TeamIndia lead 2-0 against South Africa!#Cheer4India | #CWG2022 | #B2022 pic.twitter.com/aDzWjNU1Bl
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 29, 2022
यासह भारताने दक्षिण आफ्रिकेवर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय स्टार मनिका बत्रासमोर मुशफिकुह कलाम होती. भारतीय खेळाडू मनिका बत्राने पहिल्या गेममध्ये मुशफिकुह कलामचा 11-5 अशा फरकाने पराभव केला. पहिल्या गेममध्ये तिने प्रतिस्पर्ध्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्याचवेळी दुसऱ्या गेममध्येही मनिका बत्राने प्रतिस्पर्ध्याला एकही संधी दिली नाही. हा खेळही तिने एकतर्फी पद्धतीने सहज जिंकला.
गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकणारी बत्रा पहिली भारतीय ठरली. अकुलाने दुसऱ्या एकेरीत पटेलचा 11-5, 11-3 आणि 11-6 असा पराभव करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात फिजीशी खेळणार आहे.
हेही वाचा - IND vs WI T20 Series : दुखापतीमुळे केएल राहुल टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी