बर्मिंगहॅम: 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. लॉन बॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत भारताने पदक जिंकण्याची 92 वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, तेही थेट सुवर्णपदका पटकावले ( Women team won gold medal in lawn bowls ) आहे.
महिला संघाच्या या स्पर्धेत टीम इंडियामध्ये लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया, रूपा राणी यांचा समावेश होता. ज्याने सातत्याने चांगली कामगिरी करून देशासाठी पदके जिंकली. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 17-10 असा पराभव ( India beat South Africa by 17-10 ) केला.
-
HISTORY CREATED 🥳
— SAI Media (@Media_SAI) August 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
1st Ever 🏅 in Lawn Bowls at #CommonwealthGames
Women's Fours team win 🇮🇳 it's 1st CWG medal, the prestigious 🥇 in #LawnBowls by defeating South Africa, 17-10
Congratulations ladies for taking the sport to a new level🔝
Let's #Cheer4India#India4CWG2022 pic.twitter.com/uRa9MVxfRs
">HISTORY CREATED 🥳
— SAI Media (@Media_SAI) August 2, 2022
1st Ever 🏅 in Lawn Bowls at #CommonwealthGames
Women's Fours team win 🇮🇳 it's 1st CWG medal, the prestigious 🥇 in #LawnBowls by defeating South Africa, 17-10
Congratulations ladies for taking the sport to a new level🔝
Let's #Cheer4India#India4CWG2022 pic.twitter.com/uRa9MVxfRsHISTORY CREATED 🥳
— SAI Media (@Media_SAI) August 2, 2022
1st Ever 🏅 in Lawn Bowls at #CommonwealthGames
Women's Fours team win 🇮🇳 it's 1st CWG medal, the prestigious 🥇 in #LawnBowls by defeating South Africa, 17-10
Congratulations ladies for taking the sport to a new level🔝
Let's #Cheer4India#India4CWG2022 pic.twitter.com/uRa9MVxfRs
सुमारे अडीच तास चाललेल्या या रोमांचक सामन्यात अनेक चढ-उतार आले, टीम इंडियाने सुरुवातीला आघाडी घेतली मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनेही दमदार पुनरागमन केले. शेवटी टीम इंडियाचा शानदार खेळ कामी आला आणि भारताने हा सामना 17-10 असा जिंकला.
या सामन्यात भारताने 1-0 अशी आघाडी घेतली होती, मात्र नंतर दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन केले आणि गुणसंख्या 2-1 अशी केली. जसजसा सामना पुढे जात होता, तसतसा तो अधिकच रंजक होत होता. जसजशी फेरी पुढे सरकत गेली तसतशी टीम इंडियाची आघाडीही मजबूत होत गेली. भारत 7-2 ने आघाडी घेतली होती.
मात्र, जेव्हा आघाडीचे टोक सुरू झाले तेव्हा टीम इंडियाची थोडी फरफट झाली. दक्षिण आफ्रिकेने येथे सलग गुण मिळवले आणि सामना 8-8 असा केला होता. खेळाच्या 13 फेऱ्या संपेपर्यंत, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अटीतटीचा सामना झाला, एकवेळेस भारत 12 गुणांवर होता, तर दक्षिण आफ्रिका 10 गुणांवर होता.
उपांत्य फेरीत देखील भारताने मोठा विजय मिळवला होता -
या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने न्यूझीलंडचा 16-13 असा पराभव केला होता. भारतासाठी इतिहास रचणाऱ्या चार खेळाडूंमध्ये लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया, रूपा राणी यांचा समावेश आहे.
1930 च्या सुरुवातीच्या हंगामापासून कॉमनवेल्थ गेम्समध्ये लॉन बॉल खेळला जात आहे आणि 1966 च्या गेम्समध्ये फक्त एकदाच लॉन बॉल या खेळांचा भाग नाही. लॉन बॉलमध्ये सर्वाधिक सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रम सध्या इंग्लंडच्या नावावर आहे. ज्याने 21 सुवर्णपदके जिंकली आहेत. दुसरीकडे, स्कॉटलंड 20 सुवर्णांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर, त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कधीच लॉन बॉलमध्ये पदक जिंकले नव्हते. पण आता इतिहासात प्रथमच भारताला या खेळात पदक सुवर्णपदक मिळाले आहे.
हेही वाचा - Commonwealth Games 2022 : याहिया-श्रीशंकर आणि मनप्रीत अंतिम फेरीत दाखल, तर पूनमचे हुकले पदक