बर्मिंघम - राष्ट्रकुल स्पर्धेत ( Commonwealth Games 2022 ) कुस्तीपटू बजरंग पुनियाने ( Bajrang punia won gold medal in wrestling ) पुरुषांच्या 62 किलो वजन गटात शुक्रवारी सुवर्ण पदक जिकले. बजरंगने अंतिम सामन्यात कनाडाच्या लाचनाल मॅक्निल याला 9-2 ने पराभव करत हे पदक मिळवले आहे. विशेष म्हणजे बजरंग ( Bajrang punia ) पुनियाचा हा काँमनवेल्थ गेम्समधील सलग तीसरा पदक आहे. तसेच, कॉमनवेल्थ गेम्समधील सलग दुसरा सुवर्ण पदक आहे. गेल्यावेळी गोल्ड कोस्टमधे पण त्याने सुरवर्ण पदक जिंकले होते. याच कामगिरीला त्याने कायम ठेवले आहे.
-
HATTRICK FOR BAJRANG AT CWG 🔥🔥🔥
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Tokyo Olympics 🥉medalist, 3 time World C'ships medalist @BajrangPunia is on winning streak 🔥🔥 to bag his 3rd consecutive medal at #CommonwealthGames 🥇 🥇🥈
Utter dominance by Bajrang (M-65kg) to win 🥇 #Cheer4India #India4CWG2022
1/1 pic.twitter.com/MmWqoV6jMw
">HATTRICK FOR BAJRANG AT CWG 🔥🔥🔥
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2022
Tokyo Olympics 🥉medalist, 3 time World C'ships medalist @BajrangPunia is on winning streak 🔥🔥 to bag his 3rd consecutive medal at #CommonwealthGames 🥇 🥇🥈
Utter dominance by Bajrang (M-65kg) to win 🥇 #Cheer4India #India4CWG2022
1/1 pic.twitter.com/MmWqoV6jMwHATTRICK FOR BAJRANG AT CWG 🔥🔥🔥
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2022
Tokyo Olympics 🥉medalist, 3 time World C'ships medalist @BajrangPunia is on winning streak 🔥🔥 to bag his 3rd consecutive medal at #CommonwealthGames 🥇 🥇🥈
Utter dominance by Bajrang (M-65kg) to win 🥇 #Cheer4India #India4CWG2022
1/1 pic.twitter.com/MmWqoV6jMw
हेही वाचा - World Under 20 Athletics: जागतिक 20 वर्षांखालील अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकणारी रूपल ठरली पहिली भारतीय
बजरंगने सुरुवातीपासूनच वर्चस्व दाखवत कॅनडाच्या कुस्तीपटूला कोणतीही संधी दिली नाही. त्याने पहिल्या फेरीत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर तीन गुण मिळवत स्कोअर 4-0 केला. तो पहिल्या फेरीत तो याच गुणांसह पुढे गेला. मॅक्निलने दुसऱ्या राउंड येतात आक्रमक खेळ दाखवला आणि बजरंगला टेकडाऊन करत अंक मिळवले. मात्र बजरंगने अजून दोन अंक घेण्यात यश मिळवले आणि स्कोअर 6-2 झाला. त्यानंतर बजरंगने पुन्हा मॅक्निलला बाहेर करत एक अंक मिळवला. स्कोअर 7-2 झाला. त्यानंतर बजरंगने टेकडाऊनने दोन अंक मिळवत स्कोअर 9-2 वर आणला आणि सामना जिंकला.
बजरंगने इंग्लंडच्या जॉर्ज रॅमवर 10-0 असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. बजरंगने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मॉरिशसच्या जीन गुलियाने जोरिस बांडोऊचा अवघ्या एका मिनिटात पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती. बजरंगला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला होता.
बजरंगने सुरुवातीच्या फेरीत नौरूच्या लोव बिंघमला खाली पाडून सहज विजयाची नोंद केली. बजरंगने त्याच्या प्रतिस्पर्ध्याला समजून घेण्यासाठी एक मिनिट घेतला आणि नंतर अचानक बिघमला पाडून सामना संपवला. बजरंगकडून अचानक घेण्यात आलेला हा दाव बिंघमच्या लक्षात आली नाही आणि त्याचा पराभव झाला.
भारताला आतापर्यंत इतकी पदके -
8 सुवर्ण - मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल टीम, टेबल टेनिस पुरुष टीम, सुधीर (पावर लिफ्टिंग), बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक.
8 रौप्य पदक - संकेत सरगरी, बिंदियारानी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन टीम, तुलिका मान, मुरली श्रीशंकर आणि अंशू मलिक.
7 कांस्य पदक - गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह और तेजस्विन शंकर.
हेही वाचा - Hockey Match Players Scuffled : हॉकी सामन्यात गोंधळ, लाइव्ह सामन्यात खेळाडूंची बाचाबाची