बार्बाडोस - विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल ५ मे'ला आयपीएलचा शेवटचा सामना खेळताना दिसून येईल. मोहाली येथे चेन्नई आणि पंजाब यांच्यात हा सामना आज होणार आहे. पंजाबच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्ठात आल्या आहेत. यादरम्यान कॅरेबियन बेटावरून गेलसाठी खुशखबरी आली आहे. जमैका थलाइवाज या संघात त्याचे पुनरागमन झाले आहे.
ख्रिस गेलची तब्बल दोन वर्षानंतर कॅरेबियन प्रीमियर लीगमधील टीम जमैका थलाइवाज संघात पुनरागमन झाले आहे. गेल आयपीएलनंतर या संघात खेळताना दिसून येईल. ख्रिस गेल याला संघात घेतल्याची घोषणा शनिवारी करण्यात आली.
डाव्या हाताने फलंदाजी करणारा स्फोटक फलंदाज जमैका थलाइवाज संघाचे नेतृत्व करताना दोनवेळा संघास कॅरेबियन प्रीमियर लीगचे जेतेपद मिळवून दिले होते. जमैका थलाइवाज संघ २०१३ आणि २०१६ साली जेतेपद पटकाविले होते.
जमैका थलाइवाज संघाचे मालक जेफरसन मिलर बोलताना म्हणाले, आम्हांला हे सांगताना आनंद होतोय की आयपीएलनंतर ख्रिस गेल आमच्या संघाकडून खेळणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेल सर्वात मोठा आहे. तो आमच्या संघात आल्याने आम्हाला गर्व वाटत आहे. संघाला पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यात त्याने मदत करावी. सीपीएल लीगचे तिसरे सीजन सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पार पडणार आहे.