धर्मशाला - हिमाचल सरकारकडून जमीन मिळाल्यानंतर केंद्र सरकार धर्मशाला जवळ अत्याधुनिक 'हाय एल्टीट्यूड स्पोर्टस् ट्रेनिंग सेंटर' उभारण्यासाठी तयार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. ठाकूर आज रविवारी धर्मशाला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अनुराग ठाकूर म्हणाले की, आम्ही पुढील काळात धर्मशालात क्रीडा सुविधांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही भविष्यात या शहरामध्ये अधिक स्पर्धेचे आयोजन व्हावे, यासाठी देखील काम करत आहोत.
नरेंद्र मोदी सरकार देशातील क्रीडा स्तर अधिक चांगला करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. यात चांगल्या खेळाडूंना देश आणि विदेशात सरावासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे देखील ठाकूर म्हणाले.
हिमाचल प्रदेशला क्रीडा केंद्रास तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जागतिक स्तरावरिल सुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही देखील ठाकूर यांनी यावेळी दिली.
दरम्यान, नुकतेच टोकियो ऑलिम्पिक पार पडले आहे. यात भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारताने टोकियोत 7 पदके जिंकली. यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कास्य पदकाचा समावेश आहे. भारताची ही ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ठ कामगिरी ठरली.
हेही वाचा - जो रुटला 'त्या' रणणितीपासून प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूडने का रोखलं नाही, मायकल वॉनचा कडक सवाल
हेही वाचा - टोकियो पॅराऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात 6 अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास परवानगी