ETV Bharat / sports

Case Filed Gurugram : टेनिस स्टार मारिया शआरापोव्हा आणि मायकेल शूमाकरवर एफआयआर दाखल - Latest Sports News

गुरुग्राममध्ये एका महिलेने आणि इतरांनी बिल्डर आणि प्रकल्पाच्या प्रवर्तकाविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये टेनिसपटू मारिया शारापोव्हा आणि फॉर्म्युला 1 रेसर मायकेल शूमाकर ( Maria Sharapova and Michael Schumacher ) यांचाही समावेश आहे.

Maria
Maria
author img

By

Published : Mar 17, 2022, 3:40 PM IST

हैदराबाद : माजी रशियन टेनिस स्टार मारिया शारापोव्हा ( Tennis star Maria Sharapova ) आणि माजी फॉर्म्युला 1 रेसर मायकेल शूमाकरसह ( Formula 1 racer Michael Schumacher ), अन्य 11 जणांविरुद्ध फसवणूक आणि कट रचल्याबाबत पोलिसांनी गुरुग्राम येथे गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारिया आणि शूमाकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप ( Allegations of fraud ) करणाऱ्या दिल्ली स्थित महिलेच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

नवी दिल्लीतील छतरपूर मिनी फार्ममध्ये राहणाऱ्या शेफाली अग्रवालने ( Complaint of Shefali Agarwal ) आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिने शारापोव्हा नावाने एका प्रोजेक्टमध्ये अपार्टमेंट बुक केले होते. प्रकल्पातील एका टॉवरला शूमाकरचे नाव देण्यात आले. हा प्रकल्प 2016 पर्यंत पूर्ण व्हायचा होता. परंतु कधीही सुरुवात केली नाही, ज्यामुळे मारिया आणि मायकेलवर फसवणूक केल्याचा आरोप केला गेला.

या अगोदर तक्रारदार महिलेने गुरुग्राम येथील न्यायालयात एमएस रियलटेक डेवलपमेंट एंड इंफ्रास्ट्रक्चर इंडिया प्राइवेट लिमिटेडच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये तिने शारापोव्हा आणि मायकेल शूमाकर यांच्यावर जवळपास 80 लाख रुपयांची फसवणूक ( Fraud of Rs 80 lakh ) केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने न्यायालयासमोर सांगितले की, तिने आणि तिच्या पतीने गुडगावच्या सेक्टर-73 मध्ये शारापोवाच्या नावावर निवासी अपार्टमेंट बुक केले होते.

परंतु विकासक कंपन्यांनी तिला त्यांच्या प्रकल्पात पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. जे त्यांना कधीच दिले गेले नाही. तक्रारीत म्हटले आहे की, आम्हाला जाहिरातीद्वारे प्रकल्पाची माहिती मिळाली आणि प्रकल्पाचे फोटो काढून कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला आणि आम्हाला अनेक खोटी आश्वासने देण्यात आली.

या प्रकल्पाचे प्रवर्तक म्हणून शारापोव्हा आणि शूमाकर यांनी खरेदीदारांसोबत कट रचला. फिर्यादीने आरोप केला आहे की, मारियाने घटनास्थळी भेट दिली आणि टेनिस अकादमीशिवाय स्पोर्ट्स स्टोअर उघडण्याचे आश्वासन दिले. त्याच वेळी, ती प्रकल्पाची जाहिरात करत होती आणि खोटी आश्वासने देत होती, खरेदीदारांसोबत डिनर पार्टी केली होती, असे या माहितीपत्रकात नमूद केले आहे. हे सर्व प्रकल्पासाठी केले गेले, जे कधीही झाले नाही. त्याच वेळी, मारिया शारापोवा आणि मायकेल शूमाकर यांच्याविरुद्ध कलम-34 समान हेतू, 120-बी गुन्हेगारी कट, 406 गुन्हेगारी विश्वासाचा भंग आणि आयपीसीच्या 420 फसवणूक या कलमांखाली बादशाहपूर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.