ETV Bharat / sports

IPL 2023 : आयपीएलच्या या हंगामात 5 तरुण कर्णधार आणि 5 ज्येष्ठ, अनुभवी कॅप्टन असणार आमने-सामने

आयपीएलच्या नवीन हंगामात 5 युवा कर्णधार 5 सर्वात अनुभवी कर्णधारांबरोबर स्पर्धा करणार आहेत. तुम्हाला माहीत आहे का सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण कर्णधार कोण आहे. पाहा याबाबतचा सविस्तर तपशील.

Captains Age As a IPL 2023 Captain
आयपीएलच्या हंगामातील सर्वात तरुण कर्णधार आणि ज्येष्ठ अनुभवी कर्णधार आमने-सामने
author img

By

Published : Mar 24, 2023, 6:26 PM IST

नवी दिल्ली : 31 मार्च 2023 पासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या नव्या सीझनमध्ये 5 कर्णधारांचे वय जास्त आहे तसेच त्यांचा खेळण्याचा अनुभवही मोठा आहे. तर दुसरीकडे पाच सर्वाधिक तरुण वयाचे कर्णधारही आहेत. हे तरुण आणि कमी वयाचे कर्णधार या आयपीएलच्या हंगामात ज्येष्ठ आणि अनुभवी कर्णधारांना टक्कर देणार आहेत.

महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात वयस्कर कर्णधार : आयपीएल खेळणाऱ्या 10 संघांचे कर्णधार आणि त्यांच्या वयाचे विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की, 10 संघांपैकी 5 संघांचे कर्णधार 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात वयस्कर कर्णधार म्हणून आघाडीवर आहे. महेंद्रसिंग धोनीचे वय ४१ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर सर्वात तरुण कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचे नाव संघात आहे. मात्र, तरीही त्याच्या आयपीएल खेळण्याबाबत शंका आहे.

Captains Age As a IPL 2023 Captain
आयपीएल 2023 चे कर्णधार

श्रेयस अय्यर सर्वात कमी वयाचा कणर्धार : कोलकाता नाईट रायडर्स संघाने श्रेयस अय्यरला कर्णधार बनवले असून, तो केवळ 28 वर्षांचा आहे. याआधी त्याने 3 आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले आहे. तसेच, या स्पर्धेत 28 वर्षांचे तीन कर्णधार आहेत, जे वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. वयाच्या २८ व्या वर्षी संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करीत आहे. याच सनरायझर्स हैदराबाद संघाने दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एडन मार्कराम याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. जो 28 वर्षांचा आहे. जरी तो वयाने संजू सॅमसनपेक्षा 1 महिन्याने मोठा आहे. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आयपीएल खेळण्यापासून वंचित राहिला, तर संजू सॅमसन यावेळी सर्वात तरुण कर्णधार असेल, जो राजस्थान रॉयल्सला विजयी करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

Captains Age As a IPL 2023 Captain
आयपीएल 2023 चे संघ आणि कर्णधार

हे आहेत अनुभवी आणि वयाने जास्त असलेले कर्णधार : याशिवाय इतर कर्णधारांचे वय पाहिल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधार फॅफ डुप्लेसिस 38 वर्षांचे आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने वयाची ३५ वर्षे पूर्ण केली आहेत. याशिवाय दिल्ली कॅपिटल्समध्ये ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरला नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे वय 36 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर पंजाब संघाने आपल्या संघाचे कर्णधारपद ३५ वर्षीय शिखर धवनकडे सोपवले आहे.

हे आहेत 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे कर्णधार : अशाप्रकारे पाहिले तर शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, डेव्हिड वॉर्नर आणि फाफ डुप्लेसिस असे ५ खेळाडू आहेत, ज्यांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त आहे. तर दुसरीकडे, जर आपण 30 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या खेळाडूंच्या कर्णधारांबद्दल बोललो तर केएल राहुल 30 वर्षांचा आहे आणि तो लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार असेल. त्याचवेळी गुजरात टायटन्सचा कर्णधार असलेला हार्दिक पांड्या 29 वर्षांचा आहे. संजू सॅमसन (11 नोव्हेंबर 1994), श्रेयस अय्यर (6 डिसेंबर 1994) आणि एडन मार्कराम (4 ऑक्टोबर 1994) हे 28 वर्षांचे असल्याचे सांगितले जाते आणि तिघेही जवळपास एकाच वयाचे खेळाडू आहेत. त्यांच्या जन्मतारखेत एक महिन्याचा फरक आहे.

सर्वात तरुण खेळाडू भिडणार ज्येष्ठ अनुभवी कर्णधारांना : कोलकाता नाईट रायडर्स संघाने श्रेयस अय्यरऐवजी अन्य कोणाला आपला कर्णधार म्हणून निवडले तर तो खेळाडू कोण आणि त्याचे वय किती आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. परंतु, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर सर्वात तरुण आहे. पाच सर्वात तरुण खेळाडू आहे आणि तरुण कर्णधार आहेत. जे महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मासारख्या अनुभवी कर्णधारांशी स्पर्धा करतील.

हेही वाचा : IPL 2023 Captain : आयपीएल 16 मध्ये हे खेळाडू असणार कर्णधार; जाणून घ्या आतापर्यंतचा यशस्वी कॅप्टन कोण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.