ETV Bharat / sports

Ranji Trophy Final 2023 : रणजी ट्राॅफीमध्ये बंगाल प्रथम फलंदाजी करताना 174 धावांवर गारद; तर सौराष्ट्र 81 धावांवर 2 विकेट

ईडन गार्डनवर सुरू असलेल्या रणजीच्या अंतिम सामन्यात बंगालची सौराष्ट्रबरोबर लढत सुरू आहे. सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पश्चिम बंगालला प्रथम फलंदाजीसाठी बोलावल्यानंतर बंगालच्या फलंदाजांची सौराष्ट्रच्या गोलंदाजांपुढे अक्षरश: गाळण उडाली आहे. बंगालचा निम्मा संघ अवघ्या 147 धावांवर तंबूत पोहचला आहे. पाहुया यावरील सविस्तर रिपोर्ट

Ranji Trophy Final 2023
रणजी ट्राॅफी अंतिम सामन्यात बंगालचा सौराष्ट्रबरोबर मुकाबला; बंगाल दयनीय स्थितीत, 147 धावांवर 6 विकेट
author img

By

Published : Feb 16, 2023, 2:58 PM IST

Updated : Feb 16, 2023, 5:37 PM IST

कोलकाता : सौराष्ट्रच्या साकरियाने भेदक गोलंदाजी करीत 3 विकेट घेतल्या. तर, टीम इंडियाच्या संघातून घरच्या संघात पुनरागमन केलेल्या उनाडकटने शानदार गोलंदाजी करीत 2 विकेट घेतल्या. अभिमन्यू इस्वारनला त्याने खातेसुद्धा उघडू दिले नाही. त्याने त्याला बदकवर तंबूत धाडले. सौराष्ट्रच्या गोलंदाजांनी बंगालच्या फलंदाजांचा घाम काढला. बंगालच्या 6 फलंदाजांना सौराष्ट्रने अवघ्या 65 धावांवर घरचा रस्ता दाखवला. उनाडकटने बंगालच्या संघाला सुरूंग लावत अभिमन्यूला (0) भोपळ्यावर पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला.

बंगालची फलंदाजी : अभिषेक पोरेल, शाहनाझ अहमद सध्या खेळत आहेत. शाहनाझ अहमदने संयमी खेळी करीत 95 चेंडूत 57 धावा केल्या आहेत, तर अभिषेक पोरेल 91 चेंडूत 27 धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी बंगालची फलंदाजी घसरत त्यांच्या 6 विकेट गेल्या आहेत. सौराष्ट्रने त्यांची वरची फळी कापून काढत महत्त्वाचे फलंदाज तंबूत पाठवले आहेत. सौराष्ट्राचा स्टार गोलंदाज आणि कर्णधार उनाडकट ज्याचे टीम इंडियामध्ये सिलेक्शन झाले होते, त्याने शानदार गोलंदाजी करीत 2 विकेट घेतल्या. बंगालचे सुमंता गुप्ता, अभिषेक इश्वरन, सुदीप कुमार घरमी, मनोज तिवारी यांना साधे दुहेरी आकड्याची धावसंख्यादेखील गाठता आली नाही. केवळ आकाश घातक याने 6 फलंदाजामध्ये दुहेरी 17 आकडा पार केला. बंगाल अत्यंत दयनीय स्थिती पोहचला आहे.

सौराष्ट्रची गोलंदाजी : सौराष्ट्ने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत, प्रथम गोलंदाजी करताना बंगालचा निम्मा संघ गारद केला. कर्णधार जयदेव उनाडकटने शानदार गोलंदाजी करीत बंगालच्या संघाला पहिला सुरूंग लावत अभिमन्यू इश्वरनला शून्यावर तंबूत पाठवले. त्यानंतर चेतन साकरियाने यानेदेखील भेदक गोलंदाजी करीत 3 विकेट घेतल्या. त्याने सुमंता गुप्ता याला अवघ्या 1 धावेवर झेलबाद केले, तर सुदीप कुमार घरमीच्या भोपळ्यावर यष्टी उडवल्या.

बंगालचा संघ : अभिमन्यू इश्वरन, सुमिता गुप्ता, सुदीप कुमार घरमी, अनुस्तूप मुजुमदार, मनोज तिवारी (कर्णधार), शाहबाज अहमद, अभिषेक पोरेल (विकेट किपर), आकाश दीप, आकाश घातक, इशान पोरेल, मुकेश कुमार

सौराष्ट्र संघ : हार्विक देसाई (विकेटकिपर), जय गोहील, विश्वराज जडेजा, शेल्डन जॅक्सन, अर्पित वासवदत्ता, चिराग जानी, प्रेरक मानकड, पार्थ भट, धर्मेंद्रसिंग जडेजा, जयदेव उनाडकट (कर्णधार), चेतन साकरिया

मागच्या सेमिफायनमध्ये कर्नाटक वि. सौराष्ट्र : कर्नाटकचा रणजी करंडक स्पर्धेमध्ये सुरू असलेल्या सामन्यात आज कर्नाटकने सौराष्ट्रविरुद्ध 407 धावांची मोठी खेळी केली. कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवाल याने शानदार द्विशतक झळकावत दमदार खेळी केली. काही दिवसांपूर्वीच मयंक अग्रवालला भारतीय संघातून डावलण्यात आले होते. परंतु, त्याने दमदार खेळी करीत पुन्हा एकदा भारतीय संघातील आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे संघ व्यवस्थापनाच्या चिंतेत नक्कीच वाढ झाली आहे.

हेही वाचा : ICC Test Bowlers Ranking : अश्विन कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर; जडेजानेही घेतली मोठी झेप

Last Updated : Feb 16, 2023, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.