नूर सुल्तान (कझाकिस्तान) - भारताचा अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनियाने शुक्रवारी विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्य पदकावर मोहर लावली. ६५ किलो वजनी गटात बजरंगने मंगोलियाच्या तुलगा तुमुर ऑचीरचा पराभव करत भारताला कांस्य पदक जिंकून दिले. दरम्यान, या स्पर्धेत बजरंगने यापूर्वी दोन पदके जिंकली आहेत. अशी कामगिरी करणारा बजरंग भारताचा पहिला कुस्तीपटू ठरला आहे.
यंदा विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धा कझाकिस्तानमध्ये सुरू आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या चार कुस्तीपटूंचा पराभव झाला. यानंतर भारतीयांच्या आशा महिलांमध्ये विनेश फोगट आणि पुरुषांमध्ये बजरंग पुनियावर होती. तेव्हा दोघांनीही अपेक्षित कामगिरी करत भारताला कांस्य पदक जिंकून दिले.
कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात बजरंगला मंगोलियाच्या कुस्तीपटू विरोधात सुरुवातीला ०-६ अशा पिछाडीवर होता. मात्र, बजरंग खरी कसरत दाखवून ८-७ असा विजय मिळवत कांस्य पदक आपल्या नावे केले. याआधी बजरंगने २०१३ आणि २०१८ साली या स्पर्धेत पदक जिंकले आहे. बजरंग हा विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये तीन पदके जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.
दरम्यान, या स्पर्धेत बजरंग पुनिया, विनेश फोगट यांच्यासह रवी कुमार दाहिया यानेही कांस्य पदक जिंकले आहे. बजरंगने २०१३ आणि २०१८ साली या स्पर्धेत पदक जिंकले होते. बजरंग हा जागतिक स्पर्धेत कुस्तीचा तीन पदके जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.
हेही वाचा - जागतिक कुस्ती स्पर्धा : बजरंग पुनिया अन् रवी कुमार दहियाला कांस्य
हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : विनेश फोगटची 'कांस्य' पदकावर मोहर, ऑलिम्पिकचे तिकीट पक्के