नवी दिल्ली - अव्वल भारतीय कुस्तीपटू आणि आशियाई सुवर्णपदक विजेता बजरंग पुनियाने कोरोनाविरूद्ध लढाईसाठी सरकारला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ वर्षीय पुनियाने आपल्या सहा महिन्याचे मानधन हरियाणा कोरोना रिलीफ फंडामध्ये दिले आहे. 'हरियाणा कोरोना रिलीफ फंडाच्या समर्थनासाठी मी माझे सहा महिन्यांचे मानधन देत आहे', असे पुनियाने ट्विटरवर म्हटले.
हेही वाचा - क्रिकेटच्या देवाकडून 'मिस्टर आयपीएल'ला खास शुभेच्छा
६५ किलो वजनी गटातील जगातील सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक असलेला बजरंग हा कोरोनाविरूद्धच्या लढाईत पुढे येणारा पहिला भारतीय अॅथलीट आहे. त्याच्या या देणगीचे सर्वत्र कौतुक केले जात असून क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनीही पुनियाच्या या योगदानाला 'एक प्रशंसनीय कार्य' असे म्हटले आहे.
-
एक प्रशंसनीय कार्य @BajrangPunia 🙏 https://t.co/VUg7pgVzGZ
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">एक प्रशंसनीय कार्य @BajrangPunia 🙏 https://t.co/VUg7pgVzGZ
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 23, 2020एक प्रशंसनीय कार्य @BajrangPunia 🙏 https://t.co/VUg7pgVzGZ
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 23, 2020