बरेली: राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना अशा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे की, त्यांना त्यांचा आहार आणि किट खरेदी करण्यासाठी शेतात मजुरीवर काम करावे लागत आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने पैशाची गरज भागवण्यासाठी त्यांना शेतात मजुरीवर गहू काढणीला जावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे बहुतांश खेळाडूंना योग्य आहार आणि महागडे किट पुरवता येत नाहीत.
रिठौरा कस्बा ( Rithaura town ) हे बरेली शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे. येथे सुमारे 24 खेळाडू आंब्याच्या बागेत सराव करत असून घाम गाळत आहेत. यातील बहुतांश खेळाडूंचे पालक मजूर म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. या खेळाडूंच्या गटात मुले आणि मुली दोन्ही आहेत. शेतात काम करणारी ऍथलीट काजल चक्रवर्ती हिने काही दिवसांपूर्वी लखनौ येथे झालेल्या ऍथलेटिक स्पर्धेत 5 हजार मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते. त्याचबरोबर, लखनौ विद्यापीठाच्या क्रॉस एंटी प्रतियोगितेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.
काजल चक्रवर्तीने ( Athlete Kajal Chakraborty ) बरेली जिल्ह्यापासून उत्तर प्रदेश स्तरापर्यंतच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन डझनभर पदके जिंकली आहेत. तिच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे. काजलचे वडील मजूर आहेत. मुलीच्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या गरजा भागवण्यासाठी ते पुरेसे पैसे कमवू शकत नाहीत. त्यामुळेच काजलने तिच्या ग्रुप सोबतींसोबत शेतात काम करायचं ठरवलं. पूर्वी ऊस पेरणी आणि नुकतीच मजुरी करून गहू काढणीची कामे केली आहेत. त्यातून आलेल्या पैशातून त्याच्या खाद्यपदार्थांची खरेदी केली.
अॅथलेटिक्स गटाचे प्रशिक्षक साहिबे आलम ( Athletic Group Coach Sahib Alam ) म्हणाले, त्यांच्याकडे सराव करणारे बहुतेक खेळाडू गरीब कुटुंबातील आहेत. खेळाडूला चांगली कामगिरी करण्यासाठी योग्य आहार आणि किट असणे आवश्यक असते. या गरजा पूर्ण करण्यासाठी खेळाडूंच्या गटाने करारावर गहू कापून मजूर म्हणून काम केले. साहिबे म्हणाले, क्रीडा संघटना खेळाडूंना कोणत्याही प्रकारची मदत करत नाही.
ते म्हणाले, जेव्हा एखादा खेळाडू उच्चस्तरीय स्पर्धेत पदक जिंकून येतो, तेव्हा त्याचा सन्मान केला जातो. त्याआधी खेळाडूला सर्व काही स्वतःच्या खिशातून करावे लागते. या खेळाडूंमध्ये हिंमत आहे, चैतन्य आहे पण आर्थिक परिस्थिती बिकट आहे. यामुळे त्यांना काम करावे लागले आहे. त्यांना सहकार्य मिळाल्यास ते चांगले खेळाडू बनून देशाला नावलौकिक मिळवून देऊ शकतात.
त्याच वेळी, बरेली क्षेत्रीय क्रीडा अधिकारी जितेंद्र यादव ( Regional Sports Officer Jitendra Yadav ) यांनी सांगितले की, विभागाच्या बाजूने असा कोणताही नियम नाही, ज्यामुळे त्यांना कोणतीही मदत करता येईल. हे जिल्ह्यातील होतकरू खेळाडू आहेत. स्वयंसेवी संस्था पुढे येऊन त्यांना मदत करू शकतात. ज्यांना मदत करता येईल त्यांनी पुढे यावे. ते म्हणाले की, पदक विजेत्यांना विभागाच्या नियमानुसार सुविधा दिल्या जातात.
हेही वाचा - Kiug 2021 : जैन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन