ETV Bharat / sports

Asian Games : भारतीय पुरुष हॉकी संघाचा सिंगापूरवर १६-१ ने दणदणीत विजय - भारतीय पुरुष हॉकी

Asian Games : भारतीय हॉकी संघ आशियाई खेळात चांगलाच रंग भरत आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी हॅट्ट्रिक साधत सिंगापूरचा १६-१ असा पराभव केला. संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या हॉकीत सलग दुसरा विजय मिळवला.

Asian Games
Asian Games
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 1:09 PM IST

हांगझोऊ Asian Games : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई खेळात भारत नवनविन शिखरे पादाक्रांत करत आहे. पदकांचीही लयलूट सुरू आहे. त्याचवेळी हॉकीमध्येही भारतानं आपली चमक दाखवली आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी हॅट्ट्रिक साधल्याने भारताने मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीत सलग दुसरा विजय नोंदवत सिंगापूरचा 16-1 असा पराभव केला. भारतीयांनी स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव केला होता. त्यानंतर जागतिक क्रमवारीत ४९व्या क्रमांकावर असलेल्या सिंगापूरविरुद्ध गोलवर गोल करुन चांगलाच विजय मिळवला.

भारताची गोलची लयलूट - या सामन्यात हरमनप्रीत (24वे, 39वे, 40वे, 42वे मिनिट) आणि मनदीप (12वे, 30वे, 51वे), अभिषेक (51वे, 52वे), वरुण कुमार (55वे, 55वे), ललितकुमार उपाध्याय (16वे, गुरजंत सिंग (22वे), विवेक भारताकडून सागर प्रसाद (23वा), मनप्रीत सिंग (37वा), शमशेर सिंग (38वा) अशा वेळेत यांनी गोल केले. भारताचा पुढील सामना गुरुवारी गतविजेत्या जपानशी होणार आहे. सुरुवातीपासूनच भारताचे सामन्यावर वर्चस्व दिसून येत होते. भारताला पहिली संधी सहाव्या मिनिटाला आली पण सुखजीत सिंगचा फटका सिंगापूरचा गोलरक्षक सॅंद्रन गुगनने वाचवला. पुढच्याच मिनिटाला भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला पण कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या फटकेबाजीचा सिंगापूरच्या खेळाडूंनी जोरदार बचाव केला. दोन मिनिटांनंतर मनदीप सिंगने भारताचा दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळवला पण सिंगापूरचा गोलकीपर गुगनने त्याच्या उजव्या पायाने हरमनप्रीतच्या फटक्याचा पुन्हा एक जबरदस्त बचाव केला. भारताने आक्रमण सुरूच ठेवले आणि अखेर 12व्या मिनिटाला गुरजंत सिंगने दिलेल्या परफेक्ट पासने मनदीपने गोल केला.

पेनल्टीचा फायदा नाही - पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या दोन मिनिटांत भारताने आणखी तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले पण ते सर्व वाया गेले. एकूण, भारताला पहिल्या कॉर्टरमध्ये पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले पण एकाही पेनल्टी कॉर्नरमध्ये रूपांतर गोलमध्ये करण्यात यश आले नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघ म्हणावा तेवढा प्रभावशाली ठरला नाही. मात्र भारताने पुढच्या 15 मिनिटांत वेग वाढवला आणि कसब पणाला लावून पाच गोल केले.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारत आक्रमक - दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच ललितच्या माध्यमातून भारताने आपली आघाडी अधिक आक्रमक केली. भारताने २१व्या मिनिटाला गुरजंतच्या गोलने आघाडी वाढवली. मनदीप पाससाठी जागा शोधत चेंडू टोलवत होता. तो गुरजंतला शोधण्यासाठी डावीकडून क्रॉस घेऊन आला. त्यानं हॉकीचा परिपूर्ण उपयोग केला. एका मिनिटानंतर, विवेक सागर प्रसादने पास दिल्यावर सुमितच्या शॉटने 4-0 असा स्कोअर केला. पुढच्याच मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये बदलून पाचवा गोल केला.

हरमन प्रीतची हॅटट्रिक - हाफ टाईम संपल्यावर भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि यावेळी अमित रोहिदासचा फ्लिक मनदीपने वळवला. भारताला पेनल्टी कॉर्नरच्या रूपात आणखी एक संधी होती पण तरीही हरमनप्रीत पुन्हा गडबडला कारण गोलरक्षक गुगनने तो परतवला हाफवे ब्रेकवर स्कोअर 6-0 झाला होता. शेवटच्या बदलाच्या एका मिनिटानंतर, भारताने त्यांचा 11वा पेनल्टी कॉर्नर मिळवला. हरमनप्रीतच्या फ्लिकने गोल केला. पेनल्टी कॉर्नरवरून हरमनप्रीतच्या फ्लिकवर मनप्रीतने संधी साधून 37व्या मिनिटाला भारताने आपली आघाडी वाढवली. हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरमधून आपल्या नावावर हॅट्ट्रिक नोंदवताना तीन मिनिटांत आणखी तीन गोल केल्यामुळे भारतासाठी गोलांचा पाऊस पडला. दुसरा गोल समशेरने केला.

१४ पेनल्टी कॉर्नर वाया - भारतासाठी गोलवर गोल करणे सुरूच होते. कारण भारताने आणखी दोन झटपट पेनल्टी कॉर्नर मिळवले आणि हरमनप्रीतने आणखी एक झटका मारून गोलसंख्या वाढवली. सिंगापूरसाठी झकी झुल्करनैन ५३व्या मिनिटाला एक गोल केला. त्यावरच त्यांना समाधान मानावे लागले. वरुणने सामन्याच्या शेवटच्या पाच मिनिटांत लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये केल्याने भारतासाठी गोल होतच राहिले. या सामन्यात भारताला भरपूर पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र भारताने त्याचे खूपच कमी प्रमाणात गोलमध्ये रुपांतर केले. भारतानं सामन्यात 22 पैकी फक्त आठ पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये केले.

हेही वाचा..

Indian 10m air rifle team gold: भारताच्या रायफल संघानं देशाला मिळवून दिलं पहिल सुवर्णपदक, संघात ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटील समावेश

Asian Games 2023: भारतीय महिला क्रिकेट संघाकडून श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव, एशियन गेम्समध्ये जिंकले सुवर्ण

19th Hangzhou Asian Games : अरुणाचल प्रदेशच्या खेळाडूंना चीनचा मज्जाव का?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.