मुंबई - अर्मेनियाचा अव्वल ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू लेव्हॉन अरोनियनची पत्नी महिला आंतरराष्ट्रीय मास्टर अरियानी कॅओईलीचे मंगळवारी अपघाती निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षीच तिला मृत्यूनं गाठलं.
अर्मेनियातील येरेवान येथे अरियानीची गाडी खांबावर आदळली होती. मागील १५ दिवसांपासून तिच्यावर उपाचार सुरू होते. मात्र अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली. तिच्या निधनाची बातमी तिचा पती लेव्हॉन अरोनियानने सोशल मीडियावरून दिली.
-
I have no words to express the grievance over my wife Arianne's death. She was intelligent , hard working and joyous person that lived a beautiful life...
— Levon Aronian (@LevAronian) March 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
I love you honeybun, sleep tight....
">I have no words to express the grievance over my wife Arianne's death. She was intelligent , hard working and joyous person that lived a beautiful life...
— Levon Aronian (@LevAronian) March 30, 2020
I love you honeybun, sleep tight....I have no words to express the grievance over my wife Arianne's death. She was intelligent , hard working and joyous person that lived a beautiful life...
— Levon Aronian (@LevAronian) March 30, 2020
I love you honeybun, sleep tight....
मूळ फिलिपाइन्सच्या मनिला येथे जन्मलेल्या अरियानीने वयाच्या सहाव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. तिने १६ वर्षांखालील मुलींची आशियाई स्पर्धादेखील जिंकली होती. २०१७ मध्ये लेव्हॉन-अरियानी या दोघांचा विवाह झाला होता.
हेही वाचा - कोरोनाला 'पंच' देण्यासाठी विश्वविजेती मेरी कोम मैदानात!
हेही वाचा - ऑलिम्पिकच्या नव्या तारखांची घोषणा, 'या' महिन्यात रंगणार थरार