ETV Bharat / sports

भारतीय नेमबाज अपूर्वी चंदेला 10 मीटर एअर रायफल प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल - International Shooting Sport Federation

अपूर्वीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकात सुवर्णपदक पटकावले होते

अपूर्वी चंदेला
author img

By

Published : May 1, 2019, 5:32 PM IST

नवी दिल्ली - भारताची आघाडीची महिला नेमबाज अपूर्वी चंदेलाने 10 मीटर एअर रायफल प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. तर याच प्रकारात भारताच्या अंजुम मुदगीलने दुसरे स्थान मिळवले आहे.

अपूर्वीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत 252.9 गुणांसह सुवर्णपदक जिंकले होते. या सुवर्णपदकासह अपूर्वीने 2020 मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही मिळवले होते.

अपूर्वी चंदेला
अपूर्वी चंदेला

2018 च्या एशियन गेम्समध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या अपूर्वीने अव्वल स्थान पटकावल्यानंतर ट्विटरवर आपला आनंद व्यक्त करत, माझ्या कारकिर्दीत हा मैलाचा दगड असल्याचे म्हटले आहे.

Intro:Body:

Sports NEWS 06

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.