ETV Bharat / sports

All England Championships : भारताच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यावर सिंधू, लक्ष्य आणि श्रीकांतची नजर - ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू

सिंधू, सायना नेहवाल आणि श्रीकांत या भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटूंना ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकण्यात आतापर्यंत अपयश आले आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत केवळ पुलेला गोपीचंद (2001) आणि प्रकाश पदुकोण (1980) यांनी भारतासाठी विजेतेपद मिळवले आहे.

PV Sindhu
PV Sindhu
author img

By

Published : Mar 15, 2022, 4:25 PM IST

बर्मिंगहॅम : सध्या सर्वांच्या नजरा फॉर्मात असलेल्या लक्ष्य सेन, दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू ( Olympic medalist PV Sindhu ) आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांत यांच्यावर आहेत. कारण ते बुधवारपासून सुरू होत असलेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भारताला 21 वर्षांनंतर विजेतेपद मिळवून देण्याच्या इराद्याने उतरतील.

सिंधू, सायना नेहवाल आणि श्रीकांत हे भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपचे विजेतेपद ( Badminton player wins All England Championship ) जिंकण्यात अपयशी ठरले आहेत. केवळ पुलेला गोपीचंद (2001) आणि प्रकाश पदुकोण (1980) यांनी या प्रतिष्ठित स्पर्धेत भारतासाठी विजेतेपद पटकावले आहे. सायना 2015 मध्ये अंतिम फेरीत दाखल होत विजेतेपदाच्या जवळपास पोहोचली होती, तर ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेम्स यांसारख्या इतर सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये पदक जिंकण्यात यशस्वी ठरलेल्या सिंधूला ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकण्यातही अपयश आले आहे.

अल्मोडाच्या खेळाडूला पहिल्या फेरीत आपला देशबांधव सौरभ वर्माचा सामना करावा लागेल. जर्मनी ओपनच्या दुसऱ्या फेरीत खालच्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झेंग यी मेनकडून ( Zheng Yi Men of China ) पराभूत झालेल्या सिंधूची जागतिक क्रमवारीत 17व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या वांग शी यी विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. वर्ल्ड चॅम्पियनशिप 2019 ची सुवर्णपदक विजेती सिंधूने पहिल्या दोन फेऱ्या जिंकल्यास तिला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीचा सामना करावा लागू शकतो. जर्मनी ओपनमध्ये थायलंडच्या रत्चानोक इंतानोनकडून पराभूत झालेल्या, सायनाला पहिल्या फेरीतच थायलंडच्या जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असलेल्या पोर्नपावी चोचुवोंगचे कडवे आव्हान असेल.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला श्रीकांत चांगल्या फॉर्ममध्ये ( Srikanth in good form ) असून पहिल्या फेरीत त्याचा सामना थायलंडच्या केंटाफोन वेंगचेरॉनशी होणार आहे. जर त्याने पहिली फेरी जिंकली तर त्याचा सामना पाचव्या मानांकित अँथनी सिनिसुका गिंटिंगशी होऊ शकतो. टोकियो ऑलिम्पियन बी साई प्रणीत, जो गेल्या काही महिन्यांपासून तंदुरुस्ती आणि त्याच्या कामगिरीशी झुंज देत आहे, त्याला कोविड-19 मधून बरे झाल्यानंतर पहिल्या फेरीतच ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी ( Chirag Shetty and Satviksairaj Rankireddy ) यांना जानेवारीत होणाऱ्या इंडिया ओपनमध्ये विजयी मालिका सुरू ठेवायचा प्रयत्न करणार आहे. पहिल्या फेरीत या जोडीचा सामना अलेक्झांडर डन आणि अॅडम हॉल या स्कॉटिश जोडीशी होणार आहे. धृपा कपिला आणि एमआर अर्जुन यांचा पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या मोहम्मद अहसान आणि हेंद्रा सेटियावान या जोडीशी सामना होणार आहे.

महिला दुहेरीत राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती अश्विनी पोनप्पा ( Bronze medalist Ashwini Ponnappa ) आणि एन सिक्की रेड्डी यांचा सामना जपानच्या केई नाकनिशी आणि रिन इवांगा यांच्याशी होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.