नवी दिल्ली - आशियाई युवा चॅम्पियन बॉक्सिंगपटू बेबीरोजीसाना चानू (५१ किलो) ने पोलँडमधील किल्से येथे सुरू असलेल्या एआयबीए यूथ पुरुष आणि महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. भारताचे हे स्पर्धेतील दुसरे सुवर्ण आहे. याआधी गीतिकाने (४८ किलो) सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.
मणिपूरची बॉक्सिंगपटू चानूने अंतिम फेरीत रशियाच्या वेलेरिया लिंकोवा हिचा ५-० ने पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
तर गीतिकाने पोलँडच्या नतालिया डोमिनिका हिचा एकतर्फा सामन्यात ५-० ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले.
हेही वाचा - IPL २०२१ : सनरायजर्स हैदराबादच्या अडचणीत वाढ, स्टार खेळाडूला दुखापत
हेही वाचा - KKR VS CSK : रसेलला 'या' गोष्टीचा नक्कीच पश्चाताप झाला असेल - गंभीर