ETV Bharat / sports

Cricketer Harbhajan Singh : हरभजन सिंगला आपकडून राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता - क्रीडा विद्यापीठाची कमान

2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाच्या नजरा आता राज्यसभेच्या जागेवरही लागल्या आहेत. वृत्तानुसार, आम आदमी पार्टी क्रिकेटर-समालोचक हरभजन सिंगला राज्यसभा सदस्य बनवण्याचा प्रयत्न ( Attempt to make Rajya Sabha member ) करत आहे.

Harbhajan Singh
Harbhajan Singh
author img

By

Published : Mar 17, 2022, 3:49 PM IST

नवी दिल्ली : माजी क्रिकेपटू हरभजन सिंगला ( Former cricketer Harbhajan Singh ) आम आदमी पार्टी द्विवार्षिक निवडणुकीत पंजाबमधून राज्यसभेवर पाठवू शकते. राज्यसभेतील खासदारांची संख्या वाढण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आम आदमी पार्टी लवकरच राज्यसभेच्या जागांसाठी नावांची घोषणा करू शकते. एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील नवनिर्वाचित आप सरकार क्रीडा विद्यापीठाची कमानही ( Responsibility of Sports University ) हरभजन सिंगकडे सोपवू शकते.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ( Punjab CM Bhagwant Mann ) यांनी जालंधर येते क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे वचन दिले आहे. आप पक्षाचा विजयी झाल्यानंतर हरभजन सिंगने ट्विटरवरुन भगवंत मान यांना शुभेच्छा दिल्या होत्या. भज्जी या नावाने प्रसिद्ध असलेला हरभजन म्हणाला होता, "पंजाबचा नवा मुख्यमंत्री झाल्याबद्दल आम आदमी पार्टी आणि माझे मित्र भगवंत मान यांचे अभिनंदन. चंदीगडमध्ये शपथ न घेण्याच्या निर्णयावर ते म्हणाले होते, शहीद-ए-आझम भगतसिंग यांचे गाव असलेल्या खटकरकलनमध्ये भगवंत मान नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे ऐकून खूप चांगले वाटले.

  • Congratulations to @AamAadmiParty and My friend #BhagwantMann on Becoming our New Chief minister .. great to hear that he will be taking oath as the new CM in Bhagat Singh's village Khatkarkalan, 🙏 what a picture…this is a proud moment for Mata ji 🙏🙏 pic.twitter.com/k46DNr6Pjz

    — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

खटकडलन गावात पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसंदर्भात ( Punjab Chief Minister sworn ) हरभजन म्हणाला, काय चित्र आहे. आईसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यांनी लिहिले. पंजाबमधील 'आप'चा हा पहिला विजय आहे. पंजाबमधील 117 विधानसभा मतदारसंघांपैकी 92 जागा जिंकल्या आहेत. पंजाबमधील राज्यसभेच्या पाच जागा पुढील महिन्यात रिक्त होणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, निवडणूक आयोगाने संसदेच्या उच्च सभागृह - राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकांच्या ( Rajya Sabha biennial elections ) तारखा आधीच जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या म्हणण्यानुसार, गरज भासल्यास राज्यसभेच्या जागांसाठी 31 मार्च रोजी मतदान होणार आहे. एका अंदाजानुसार, राज्यसभा निवडणुकीनंतर संसदेत 'आप'च्या खासदारांची संख्या 3 वरून 8 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.