कोलकाता - तिरंदाजी वर्ल्डकपच्या पहिल्या तीन टप्प्यातील निवड चाचणीमध्ये भाग घेण्यासाठी आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाने (एएआय) संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या २४ सदस्यीय खेळाडूंमध्ये कंपाउंड पुरुष आणि महिला तिरंदाजांचा समावेश आहे. दिल्लीतील चाचणीनंतर या तिरंदाजांची निवड करण्यात आली.
हेही वाचा - सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : कार्तिकच्या नेतृत्वात तामिळनाडूचे दुसरे विजेतेपद
एएआयने म्हटल्याप्रमाणे, "७० कंपाउंड तिरंदाज चाचणीसाठी पात्र होते. यात पुरुष विभागात ३२५ पेक्षा जास्त गुण मिळविणारे ३२ खेळाडू आणि महिला विभागात ६८० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या ३८ खेळाडूंचा समावेश होता."
एएआयने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आठ पुरुष आणि आठ महिला नेमबाजांची रिकर्व्ह प्रकारात निवड केली. पुणे येथील आर्मी क्रीडा संस्था येथे ५ ते ९ मार्च दरम्यानच्या अंतिम निवड चाचणीनंतर पुरुष व महिला गटात तीन खेळाडूंची निवड केली जाईल.
संभाव्य खेळाडूंची सूची -
- रिकर्व्ह पुरुष - अतानू दास, तरुणदीप राय, प्रवीण जाधव, कपिल, जयंत तालूकदार, बी धीरज, यशदीप भोगा आणि सुखमणी बाबरेकर.
- रिकर्व्ह महिला - दीपिका कुमारी, अंकिता भकत, एल बॉम्बेला देवी, कोमलिका बारी, मधु वेदवान, संगीता, रिद्धि बारिया आणि तिशा संचेती.
- कंपाउंड पुरुष - अभिषेक वर्मा, रजत चौहान, अमन सैनी, प्रवीण कुमार, संगमप्रीत बिसला, एमआर भारद्वाज, रिषभ यादव, मयंक रावत, सुखबीर सिंग, राहुल, अर्जुन कुमार आणि सी श्रीधर.
- कंपाउंड महिला - व्ही. ज्योती सुरेखा, रागिनी मार्को, रेखा लांडेकर, मुस्कान किरार, प्रिया गुर्जर, स्वाती दुधवाल, तृषा देब, सच्ची धल्ला, अनुराधा अहिरवार, अक्षिता, अरिशा चौधरी आणि प्रगती.