नवी दिल्ली - कॅलिफोर्नियाचे ८३ वर्षीय वेटलिफ्टर रॉबर्ट स्ट्रेंज यांच्यावर डोपिंगप्रकरणी एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. स्ट्रेंज यांनी हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा वेटलिफ्टिंग सुरू केली होती. त्यानंतर, २०१९च्या मास्टर्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये स्ट्रेंज यांनी सुवर्णपदक जिंकले होते.
हेही वाचा - बीसीसीआयच्या 'बॉस'ला विराटचा धोबीपछाड!
स्ट्रेंज यांनी ही बंदी स्वीकारली आहे. 'मास्टर्स वर्ल्ड चॅम्पियनशिप दरम्यान बंदी असलेल्या डीहाइड्रोएपिअंड्रोस्टेरोन (डीएचईए) या उत्तेजकाचे स्ट्रेंज यांनी सेवन केले होते', असे अमेरिकेच्या अँटी-डोपिंग एजन्सीने शुक्रवारी सांगितले आहे.
डॉक्टरांच्या सूचनेनुसार, डीएचईएचे जास्त सेवन केल्यामुळे त्याच्यावर फक्त एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी पहिल्यांदा स्ट्रेंज यांनी वेटलिफ्टिंगमध्ये सहभाग नोंदवला होता.