ETV Bharat / sports

44th Chess Olympiad : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जगातील सर्वात मोठ्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन - खेल समाचार

चेन्नईजवळील ममल्लापुरम येथे चेस ऑलिम्पियाड 2022 च्या 44 व्या हंगामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी उद्घाटन केले. चेन्नईतील 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या उद्घाटन समारंभात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन ( Tamil Nadu CM MK Stalin ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला. ( Chess Olympiad Opening Ceremony )

Chess Olympiad In Chennai
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जगातील सर्वात मोठ्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन
author img

By

Published : Jul 28, 2022, 8:06 PM IST

चेन्नई ( तामिळनाडू ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी गुरुवारी संध्याकाळी चेन्नईतील जेएलएन इनडोअर स्टेडियममध्ये 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे उद्घाटन केले. 28-29 जुलै रोजी पंतप्रधान गुजरात आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. मिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन ( Tamil Nadu CM MK Stalin ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला. ( Chess Olympiad Opening Ceremony )

भव्य दिव्य असे उद्घाटन : चेन्नईतील जेएलएन इनडोअर स्टेडियमवर रविवारी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे भव्य उद्घाटन झाले. PM मोदींनी 19 जून 2022 रोजी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल स्टेडियमवर प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिलेचा शुभारंभ केला. मशालने 40 दिवसांच्या कालावधीत देशातील 75 प्रतिष्ठित ठिकाणांचा प्रवास म्हणजे सुमारे 20,000 किमी प्रवास केला. FIDE स्वित्झर्लंडमधील मुख्यालयात जाण्यापूर्वी ते महाबलीपुरम येथे संपणार आहे.

१८७ देशांचा सहभाग : 44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड चेन्नई येथे 28 जुलै ते 9 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. 1927 पासून आयोजित, ही प्रतिष्ठित स्पर्धा प्रथमच भारतात आणि 30 वर्षांनंतर आशियामध्ये आयोजित केली जात आहे. 187 देशांचा सहभाग असल्याने कोणत्याही बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील हा सर्वात मोठा सहभाग असेल. भारतही या स्पर्धेत आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ उतरवत आहे. यात 6 संघातील 30 खेळाडूंचा समावेश आहे.

पाकिस्तान सहभागी होणार नाही : २०२० ऑनलाइन ऑलिम्पियाडमध्ये भारत रशियासोबत संयुक्त विजेता होता. यावेळी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये विक्रमी 187 देशांचे संघ खुल्या गटात आणि 162 संघ महिला गटात सहभागी होत आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानने 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधून स्वतःला बाहेर काढले आहे. पाक संघ भारतात पोहोचला असताना पाकने हा निर्णय घेतला आहे.

भारताची नॉर्वे, अमेरिकेसोबत कडवी स्पर्धा : यावेळी रशिया आणि चीन ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होणार नाहीत. अशा स्थितीत भारताची नॉर्वे, अमेरिकेशी कडवी स्पर्धा असेल. त्याचवेळी पाच वेळा विश्वविजेता आणि अनुभवी खेळाडू विश्वनाथन आनंदने ऑलिम्पियाडमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो या स्पर्धेशी मेंटॉर म्हणून जोडला गेला आहे.

हेही वाचा : Jeet Trivedi Video : जीत त्रिवेदीने डोळ्यावर पट्टी बांधून 62 सेकंदात 32 सोंगट्या मांडत नोंदवला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.