ETV Bharat / sports

देशासाठी काय पण! कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी १५ वर्षीय खेळाडूने उचलले 'हे' पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्यासाठी मदत करा, असे आवाहन केले आहे. त्याच्या या आवाहनाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत असून अनेक दानशूर व्यक्तींनी मदत दिली आहे. भारतीय १५ वर्षीय गोल्फपटू अर्जून भाटी याने कोरोना लढ्याच्या मदतीसाठी, जिंकलेली १०२ पारितोषिके विकली आहेत. यातून मिळालेली ४.३० लाख रुपयांची रक्कम त्याने पंतप्रधान सहाय्यता निधीत जमाही केली. याा तीन विश्व गोल्फ चॅम्पियन्सशीपची पारितोषिके होती. तर अन्य राष्ट्रीय जेतेपदं होती.

15 year old golfer arjun bhati donates rs 4 dot 30 lakh to pm cares fund
देशासाठी काय पण..! कोरोना लढ्यासाठी १५ वर्षीय खेळाडूनं विकली जिंकलेली चषकं, जमा रक्कम दिली दान
author img

By

Published : Apr 8, 2020, 1:09 PM IST

मुंबई - कोरोनाविरोधात लढ्यासाठी दानशूरांचे हात सरसावले असून मदतीचा ओघ सुरू आहे. अशात भारताच्या एका १५ वर्षीय खेळाडूंने या कामी मदत करण्यासाठी पैसे नसल्याने, कारकीर्दित जिंकलेली पदके विकल्याचे समोर आले आहे. त्या खेळाडूने विक्रीतून मिळालेली रक्कम कोरोना लढ्यासाठी दिली आहे. दरम्यान, त्या खेळाडूचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्यासाठी मदत करा, असे आवाहन केले आहे. त्याच्या या आवाहनाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत असून अनेक दानशूर व्यक्तींनी मदत दिली आहे. भारतीय १५ वर्षीय गोल्फपटू अर्जून भाटी याने कोरोना लढ्याच्या मदतीसाठी, जिंकलेली १०२ पदकं विकली आहेत. यातून मिळालेली ४.३० लाख रुपयांची रक्कम त्याने पंतप्रधान सहाय्यता निधीत जमाही केली. यात तीन विश्व गोल्फ चॅम्पियन्सशीपची पदकं होती आणि अन्य राष्ट्रीय जेतेपदं होती.

  • आपको🙏 8 साल में जो देश,विदेश से जीतकर कमाई हुई 102 ट्रोफ़ी देश संकट के समय मैंने 102 लोगों को दे दी,उनसे आए हुए कुल-4,30,000-Rs आज PM Care Fund में देश की मदद को दिए,ये सुनकर दादी रोई फिर बोली तू सच में अर्जुन है,आज देश के लोग बचने चाहिए ट्रोफ़ी तो🏆फिर आ जाएँगी,@narendramodi 🇮🇳 pic.twitter.com/wmoJtyObzi

    — Arjun Bhati - 🇮🇳 (@arjunbhatigolf) April 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या संदर्भात अर्जूनने ट्विट केले आहे त्यात तो म्हणतो, 'मी गेल्या ८ वर्षांत १०२ चषकं जिंकली आहेत. ती सर्व चषकं विकून मी ४.३० लाखांचा निधी जमा केला आहे आणि तो मी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिला आहे. हे ऐकून माझी आजी रडली आणि म्हणाली, तु खरंच अर्जुन आहे. आज देशातील लोक वाचले पाहिजेत, चषकं तर पुन्हाही मिळवशील.'

दरम्यान, याआधी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) पंतप्रधान मदत निधीसाठी २५ लाख रुपयाचे दान दिले आहे. कोलकाता येथील फुटबॉल क्लब मोहन बागाननेही २० लाख रुपये दिले आहेत. याशिवाय सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, बजरंग पुनिया, पी. व्ही. सिंधू, मेरी कोम, मिताली राज, रोहित शर्मा, विराट कोहली, पूनम यादव, दीप्ती शर्मा, केदार जाधव, हरभजन सिंग, युवराज सिंह, हिमा दास, इरफान पठाण, युसूफ पठाण, चेतेश्वर पुजारा, सुनिल गावस्कर आदींनी मदत दिली आहे.

हेही वाचा - Video : इरफानचा सामूहिक नमाज पठण करणाऱ्यांसाठी संदेश, म्हणाला...

हेही वाचा - कोरोना लढ्यासाठी बटलरच्या जर्सीचा लिलाव; मिळाली 'इतक्या' लाखांची बोली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.