ETV Bharat / sports

Tokyo Olympics : भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव

भारतीय हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकधील दुसऱ्या सामन्यात दारूण पराभव पत्कारावा लागला. ग्रुप ए मधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 7-1 ने धुव्वा उडवला.

Tokyo Olympics : Australia Beat India Men's Hockey Team by 7-1
Tokyo Olympics : भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव
author img

By

Published : Jul 25, 2021, 4:56 PM IST

Updated : Jul 25, 2021, 5:19 PM IST

टोकियो - भारतीय हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकधील दुसऱ्या सामन्यात दारूण पराभव पत्कारावा लागला. ग्रुप ए मधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 7-1 ने धुव्वा उडवला.

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव करत आश्वासक सुरूवात केली होती. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ संपूर्णपणे निष्प्रभ दिसला. भारतीय संघाची बचावफळी दुबळी असल्याचे दिसून आले. परिणामी भारतीय संघाला ऑलिम्पिक इतिहासात सर्वात लाजिरवाण्या पराभवाला समोरे जावे लागले.

सामन्याच्या 10व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर डॅनिएल जेम्सने गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सामन्याच्या 26 मिनिटांपर्यंत ही आघाडी 4-0 अशी केली. 21व्या मिनिटाला जेरेमी हेवर्ड्स, 23व्या मिनिटाला फ्लीन ओगिलव्हीइने तर 26व्या मिनिटाला जोशूआ बेल्ट्ज याने गोल केला. दुसऱ्या हाफमध्ये भारताने आक्रमक खेळ केला. पण, ते गोल करण्यात अपयशी ठरले.

दिलप्रीत सिंगने 34व्या मिनिटाला पहिला गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आणखी जोरदार खेळ केला. 40व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर ब्लॅक गोव्हर्सने गोल केला. त्यानंतर गोव्हर्सनेच कॉर्नरवर 42व्या मिनिटाला गोल केला आणि चौथ्या सत्रात टीम ब्रँड 51व्या मिनिटाला गोल करत ऑस्ट्रेलियाची आघाडी 7-1 अशी मजबूत केली.

दरम्यान, भारताला ग्रुप ए मध्ये स्पेन, अर्जेंटिना, जपान यांच्याविरुद्ध खेळायचे आहे. पुढील सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील पराभवातून धडा घेत जोरदार वापसी करण्याचा प्रयत्न करेल. भारताला पुढील तिन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

हेही वाचा - Tokyo Olympics: कोरोना काळात ऑलिम्पिकची तयारी सोडून रुग्णांची सेवा करणाऱ्या शूटरने जिंकलं सुवर्णपदक

हेही वाचा - Tokyo Olympics: नौकानयनमध्ये भारताच्या पदकाच्या वाढल्या; भारतीय जोडी उपांत्य फेरीत

Last Updated : Jul 25, 2021, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.