ETV Bharat / sports

Tokyo Olympics: दमदार पुनरागमन! भारतीय महिला हॉकी संघाचा आयर्लंडवर विजय - भारत

राणी रामपालच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडचा 1-0 ने पराभव केला.

Tokyo Olympics 2020 : Indian women's hockey team beat Ireland, keep quarter-finals hope alive

author img

By

Published : Jul 30, 2021, 12:15 PM IST

टोकियो - भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिला विजय मिळवला. राणी रामपालच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने आयर्लंडचा 1-0 ने पराभव केला. या विजयासह भारतीय संघाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. भारताकडून एकमात्र गोल 57 व्या मिनिटाला नवनीत कौर हिने केला.

पहिल्या तीन क्वार्टरमध्ये भारत आणि आयरलँड संघाला एकही गोल करता आला नाही. परंतु चौथ्या क्वार्टरमधील 57 व्या मिनिटाला नवनीत कौरने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. भारताला या सामन्यात 14 पेनाल्टी कॉर्नर मिळाले. पण यावर भारतीय खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले. यातील 10 पेनाल्टी कॉर्नर तर दुसऱ्या क्वार्टरमध्ये मिळाले.

दरम्यान, भारतीय संघाने ग्रुप ए मध्ये आतापर्यंत चार सामने खेळली आहेत. यातील तीन सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. आजचा सामना भारतासाठी करो या मरो स्थितीतील होता. परंतु भारतीय संघाने हा सामना जिंकत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.

हेही वाचा - Tokyo Olympics : मराठमोळ्या अविनाश साबळेचा ऑलिम्पिकध्ये नॅशनल विक्रम, पण...

हेही वाचा - Tokyo Olympic : शाब्बाश पोरी! लवलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीत; भारताचे पदक पक्के

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.