ETV Bharat / sports

न्यूझीलंड दौरा : राणी रामपालकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व - भारतीय महिला हॉकी संघाची न्यूझीलंड दौरा

हॉकी इंडियाने न्यूझीलंड दौऱ्यासाठी २० सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यात राणीला कर्णधार तर गोलरक्षक सविता हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपण्यात आली आहे. या दौऱ्यातील भारताचा पहिला सामना न्यूझीलंडच्या डेव्हलपमेंट संघाविरुद्ध २५ जानेवारीला खेळला जाईल.

rani rampal to lead indian womens hockey team in new zealand tour
न्यूझीलंड दौरा : राणी रामपालकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व
author img

By

Published : Jan 15, 2020, 7:36 AM IST

नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकी संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताची आघाडीवीर राणी रामपाल हिच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

हॉकी इंडियाने न्यूझीलंड दौऱ्यासाठी २० सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यात राणीला कर्णधार तर गोलरक्षक सविता हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपण्यात आली आहे. या दौऱ्यातील भारताचा पहिला सामना न्यूझीलंडच्या डेव्हलपमेंट संघाविरुद्ध २५ जानेवारीला खेळला जाईल.

rani rampal to lead indian womens hockey team in new zealand tour
राणी रामपाल

न्यूझीलंडच्या महिला संघाविरुद्ध २७ आणि २९ जानेवारीला उर्वरित दोन सामने होतील. त्यानंतर भारतीय संघ ४ फेब्रुवारीला ग्रेट ब्रिटनशी दोन हात करेल आणि ५ फेब्रुवारीला न्यूझीलंडच्या महिला संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्याने या दौऱ्याची सांगता होईल.

भारतीय महिला हॉकी संघ...
  • भारताचा महिला हॉकी संघ -
    राणी रामपाल (कर्णधार), सविता (गोलरक्षक), रजनी इथिमार्पू, दीप ग्रेस इक्का, गुरजित कौर, रिना खोखार, सलिमा टेटे, सुशीला चानू, निशा, नमिता टोप्पो, उदिता, मोनिका, लिलिमा मिन्झ, नेहा, सोनिका, शर्मिला देवी, नवनीत कौर, लालरेमसियामी, वंदना कटारिया, नवज्योत कौर.

हेही वाचा - भारतीय हॉकी संघाची डिफेंडर सुनिता लाकडाची निवृत्ती

हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना बलाढ्य अर्जेंटिनाशी

Intro:Body:

sports news

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.