नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकी संघ विरुध्द ग्रेट ब्रिटन या संघामध्ये पाच सामन्यांची मालिका इंग्लंडच्या मारलो या ठिकाणी खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील मंगळवारी झालेला तिसरा सामना भारतीय महिलांनी ०-० ने अनिर्णित राखला.
-
FT: 🇬🇧 0-0 🇮🇳
— Hockey India (@TheHockeyIndia) October 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A clean slate, but the Eves have successfully clung on to their streak of being unbeaten in the tournament! #IndiaKaGame #EnglandTour #GBRvIND pic.twitter.com/ebJ9vujc8Y
">FT: 🇬🇧 0-0 🇮🇳
— Hockey India (@TheHockeyIndia) October 1, 2019
A clean slate, but the Eves have successfully clung on to their streak of being unbeaten in the tournament! #IndiaKaGame #EnglandTour #GBRvIND pic.twitter.com/ebJ9vujc8YFT: 🇬🇧 0-0 🇮🇳
— Hockey India (@TheHockeyIndia) October 1, 2019
A clean slate, but the Eves have successfully clung on to their streak of being unbeaten in the tournament! #IndiaKaGame #EnglandTour #GBRvIND pic.twitter.com/ebJ9vujc8Y
पहिल्या हाफमध्ये काही काळ दोन्ही संघांनी सुरूवातील सावध खेळ केला. मात्र, अचानक भारतीय संघाने आपला पावित्रा बदलत आक्रमक धोरण स्वीकारले. याचा फायदा भारतीय संघाला पेनाल्टी कॉर्नरच्या रुपाने मिळाला. पण, भारतीय संघाला पेनाल्टी कॉर्नरवर गोल करण्यात यशस्वी आले नाही.
भारताला २० व्या मिनिटाला आणखी एक पेनाल्टी कॉर्नरच्या रुपाने संधी मिळाली. मात्र, ब्रिटनच्या संघाने यावेळी शानदार बचाव केला. त्यानंतर ब्रिटनने आक्रमक धोरण स्वीकारत ३४ व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळवला. तेव्हा भारतीय गोलरक्षक सविताने शानदार बचाव करत ब्रिटनचे आक्रमण मोडीत काढले.
हेही वाचा - महिला हॉकी : शेवटच्या मिनिटात गुरजीतने केलेल्या गोलमुळे भारताचा ग्रेट ब्रिटनवर विजय
दुसऱ्या हाफमध्ये भारताला आणखी एक पेनाल्टी कॉर्नर मिळाला. पण यावरही भारतीय संघ गोल करु शकला नाही. त्यानंतर दोन्ही संघानी आक्रमण सुरूच ठेवले. मात्र, दोन्ही संघाला गोल करण्यात यश आले नाही आणि सामना ०-०ने अनिर्णित राहिला. दरम्यान, या मालिकेतील चौथा सामना आज बुधवारी होणार आहे.
हेही वाचा - हॉकी : भारताचा विजयी चौकार, विश्वविजेता बेल्जियमचा २-१ ने केला पराभव