टोकियो - भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंट स्पर्धा जिंकली आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघावर ५-० अशा फरकाने विजय मिळवला. सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून वर्चस्व निर्माण केले होते.
सामन्याच्या सुरुवातीच्या सातव्या मिनिटालाचा भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंह याने पहिला गोल केला. त्यानंतर शमशेर सिंहने १८ व्या मिनिटाला, नीलाकांता शर्माने २२ व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर गुरसाहिबजीत सिंगने २६ व्या तर मनदीप सिंगने २७ व्या मिनिटाला गोल केला.
-
Make way for the WINNERS!! 🇮🇳🥇
— Hockey India (@TheHockeyIndia) August 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
FIH Series Finals: ✔
Olympic Test Event: ✔
Next 🆙: Olympic Qualifier #IndiaKaGame #ReadySteadyTokyo #Tokyo2020 @WeAreTeamIndia pic.twitter.com/FFToOT0ijj
">Make way for the WINNERS!! 🇮🇳🥇
— Hockey India (@TheHockeyIndia) August 21, 2019
FIH Series Finals: ✔
Olympic Test Event: ✔
Next 🆙: Olympic Qualifier #IndiaKaGame #ReadySteadyTokyo #Tokyo2020 @WeAreTeamIndia pic.twitter.com/FFToOT0ijjMake way for the WINNERS!! 🇮🇳🥇
— Hockey India (@TheHockeyIndia) August 21, 2019
FIH Series Finals: ✔
Olympic Test Event: ✔
Next 🆙: Olympic Qualifier #IndiaKaGame #ReadySteadyTokyo #Tokyo2020 @WeAreTeamIndia pic.twitter.com/FFToOT0ijj
२०२० मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकचे तिकीट मिळण्यासाठी एफआयएच ऑलिम्पिक क्वालिफायर विजेता ठरणे आवश्यक आहे. ही क्वालिफायर स्पर्धा २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी हॉकी संघांना ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंट खेळावी लागते.
दरम्यान, भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत राउंड रॉबिन फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड केली आहे.