नई दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक कास्य पदक विजेता भारतीय हॉकी संघाचा स्टार ड्रॅग फ्लिकर रूपिंदर पाल सिंह याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली.
रूपिंदर पाल सिंह याने या संदर्भात एक ट्विट केले आहे. यात तो म्हणतो, मी तुम्हाला भारतीय हॉकी संघातून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय सांगू इच्छितो. मागील काही महिने, माझ्या जीवनातील सर्वश्रेष्ठ राहिले. टोकियोमध्ये आपल्या संघासोबत पोडियमवर उभे राहणे हा अनुभव मी माझ्या आयुष्यात विसरणार नाही.
-
Hi everyone, wanted to share an important announcement with you all. pic.twitter.com/CwLFQ0ZVvj
— Rupinder Pal Singh (@rupinderbob3) September 30, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Hi everyone, wanted to share an important announcement with you all. pic.twitter.com/CwLFQ0ZVvj
— Rupinder Pal Singh (@rupinderbob3) September 30, 2021Hi everyone, wanted to share an important announcement with you all. pic.twitter.com/CwLFQ0ZVvj
— Rupinder Pal Singh (@rupinderbob3) September 30, 2021
युवा आणि प्रतिभावान खेळाडूंसाठी संधी देण्याची वेळ आली आहे. असे मला वाटत. मी मागील 13 वर्षापासून भारतासाठी खेळण्याचा आनंद घेत आहे. ही संधी युवा खेळाडूंना मिळायला हवी, असे देखील रूपिंदर पाल सिंहने म्हटलं आहे.
रूपिंदर पाल सिंहने भारतासाठी 223 सामने खेळली आहेत. तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये 41 वर्षानंतर पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने कास्य पदकाच्या सामन्यात जर्मनीचा 5-4 ने पराभव करत पदक जिंकले होते. या सामन्यात रुपिंदर पाल सिंहने एक गोल केला होता. याशिवाय सिमरनजीत सिंहने दोन तर हार्दिक सिंह आणि हरमनप्रीत सिंह यांनी प्रत्येकी 1-1 गोल केला होता.
हेही वाचा - लग्नासाठी कशी मुलगी हवी? नीरज चोप्राने लाजून दिलं उत्तर
हेही वाचा - IND W vs AUS W: भारताच्या लंचपर्यंत 1 बाद 101 धावा; स्मृतीचे नाबाद अर्धशतक