ऑकलंड - भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंड दौऱ्याचा शेवट विजयाने केला. पाच सामन्याच्या दौऱ्यातील, अखेरच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ३-० ने मात दिली. भारतीय स्ट्रायकर नवनीत कौरने दोन गोल केले.
पहिला हाफ गोलरहित बरोबरीत सुटला होता. दुसऱ्या हाफमध्ये ४५ व्या मिनिटाला नवनीत कौरने पहिला गोल केला. त्यानंतर ५४ व्या मिनिटाला शर्मिलाने आणखी एक गोल करत भारताला २-० ने आघाडी मिळवून दिली.
सामन्याच्या ५८ व्या मिनिटाला नवनीतने शानदार गोल केला. दरम्यान, भारतीय संघाने या दौऱ्यातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड डेव्हलपमेंट संघाला ४-० ने धूळ चारली होती. त्यानंतरच्या दोन सामन्यात भारताला वरिष्ठ संघाकडून पराभूत व्हावे लागले. चौथ्या सामन्यात भारताने ऑलिम्पिक विजेत्या ग्रेट ब्रिटनचा पराभव केला.
हेही वाचा - हॉकी : भारतीय संघाने ऑलिम्पिक विजेत्या ग्रेट ब्रिटनला दिला पराभवाचा धक्का
हेही वाचा - राणीने जिंकला 'वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर'चा पुरस्कार