टोकियो - महिला हॉकी गट अ मधील पहिल्या सामन्यात नेदरलँडने भारतीय संघाला 5 विरुद्ध 1 गोलने हरवले. भारताकडून कर्णधार रानीने एकमेव गोल केला. पहिल्या तीन क्वार्टरपर्यंत स्कोर 1-1 बरोबरीत होता, मात्र त्यानंतर नेदरलँडच्या महिलांनी सामन्यात जोरदार पुनरागमन करत सलद चार गोल नोंदवून स्कोर 5-1 वर पोहचवला. या सामन्यातील विजयाबरोबरच नेदरलँड हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकीमध्ये भारत व नेदरलँड संघात गट अ मध्ये सामना खेळवण्यात आला. दोन्ही टीम पहिल्या हाफमध्ये एक-एक गोल करून बरोबरीत होत्या. नेदरलँडची एल्बर्स फेलिस हिने खेळाच्या सहाव्या मिनिटाला पहिला गोल नोंदवून सामन्यात आघाडी घेतली. भारताची कर्णधार रानी ने 28 व्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल करत सामना बरोबरीत आणला.
तिसऱ्या क्वार्टर पर्यंत स्कोर 1-1 बरोबरीत होता. दरम्यान नेदरलँडला तीन-तीन पेनाल्टी शुटआउटची संधी मिळाली होती, मात्र गोलमध्ये रुपांतर करण्यात त्यांना यश आले नाही.
नेदरलँडच्या महिलांनी तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताविरुद्ध दुसरा गोल नोंदवला व सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली. नेदरलँडची खेळाडू जोहाना मारिया हिने खेळाच्या 33 व्या मिनिटाला पेनाल्टी शुटआउटवर गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली.
एल्बर्स फेलिस हिने सामन्यात दोन करून संघाला आघाडी मिळवून दिली. नेदरलँडकडून मैटला फ्रेडरिक 43 व्या मिनिटाला तिसरा गोल केला. त्यानंतर सामन्याच्या 45 व्या मिनिटाला नेदरलँडने चौथा गोल नोंदवला. नेदरलँडने भारताविरुद्धच्या सामन्यात एकतर्फी आघाडी घेत 52 व्या मिनिटाला पाचवा गोल नोंदवून भारताला 5 विरुद्ध 1 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले.