ETV Bharat / sports

राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या यजमानपदासाठी हॉकी इंडियाचे आमंत्रण - to host national hockey championship 2021 news

"यजमानपदासाठी दावा करण्याची 11 मे ही शेवटची तारीख आहे. आंतरविभाग राष्ट्रीय चॅम्पियनशिप आणि अकादमी राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2021 ची अंतिम मुदत 5 जून आहे", असे हॉकी इंडियाने सांगितले.

Hockey india invites wishers to host national championship 2021
राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या यजमानपदासाठी हॉकी इंडियाचे आमंत्रण
author img

By

Published : May 6, 2020, 9:31 AM IST

नवी दिल्ली - 2021मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या आयोजनासाठी इच्छुक असणाऱ्यांना हॉकी इंडियाने मंगळवारी आमंत्रित केले आहे. प्रथम विभागाची पहिली राष्ट्रीय चॅम्पियनशिप आणि राष्ट्रीय चॅम्पियनशिप अकादमीच्या यजमानपदासाठी 'एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट'ला आमंत्रित करण्यात आले आहे.

"यजमानपदासाठी इच्छा व्यक्त करण्याची 11 मे ही शेवटची तारीख आहे. आंतरविभाग राष्ट्रीय चॅम्पियनशिप आणि अकादमी राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2021 ची अंतिम मुदत 5 जून आहे", असे हॉकी इंडियाने सांगितले. संघटनेने म्हटले आहे, की 1 जानेवारी 2021 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत ज्येष्ठ पुरुष व महिला गटात राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

हॉकी इंडियाने पुढे सांगितले, की ज्युनियर, सब ज्युनियर पुरुष आणि महिला यांच्यासाठी राष्ट्रीय चॅम्पियनशिप 15 फेब्रुवारी ते 30 एप्रिल 2021 दरम्यान घेण्यात येईल. यजमान सदस्य युनिटशी चर्चा झाल्यानंतर हॉकी इंडिया तारखांची घोषणा करेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.