नवी दिल्ली - हॉकी इंडियाकडून भुवनेश्वर येथे रंगणाऱ्या हॉकी सिरीज फायनल स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व हे मनप्रीत सिंगकडे देणयात आले आहे. तर रमनदीप सिंहचे ९ महिन्यानंतर भारतीय हॉकी संघात पुनरागमन झाले आहे.
हॉकी सिरीज फायनल स्पर्धा ६ ते १५ जून दरम्यान भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा पहिला सामना रशियाशी होणार आहे. अनुभवी डिफेंडर बिरेंदर लाक्राकडे संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
हॉकी सिरीज फायनल स्पर्धेसाठी भारताचा समावेश अ गटात करण्यात आला असून या गटात भारतासह पोलंड, रशिया आणि उझबेगिस्तानचा या संघाचा समावेश करण्यात आला आहे. तर ब गटात दक्षिण आफ्रिका, जपान, अमेरिका आणि मेक्सिको या देशांचा समावेश केला आहे.
हॉकी सिरीज फायनल स्पर्धेसाठी असा असेल भारतीय संघाची
- गोलकीपर - कृशन बी पाठक, पीआर श्रीजेश
- डिफेंडर - हरमनप्रीत सिंग, बिरेंदर लाक्रा, सुरेंदर कुमार, वरुण कुमार, अमित रोहिदास, गुरिंदर सिंग,
- मिडफील्डर - मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, सुमित, निळकंठ शर्मा
- फॉरवर्ड - मनदीप सिंग, आकाशदीप सिंग, रमनदीप सिंह, गुरसाहिबजीत सिंग, सिमरनजीत सिंह