नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांचा कार्यकाळ मे 2021 पर्यंत वाढवण्यात आला आहे. एफआयएच अध्यक्ष बत्रा आणि कार्यकारी मंडळाच्या सदस्यांचा कार्यकाळ यावर्षी ऑक्टोबरमध्ये संपणार होता. परंतु एफआयएचच्या 47 व्या कॉंग्रेसच्या स्थगितीनंतर त्यांचे कार्यकाळ पुढील एक वर्षासाठी वाढवण्यात आले आहे.
एफआयएचने एका निवेदनात म्हटले आहे, की कोरोना व्हायरस या साथीच्या आजारामुळे ही 47 वी एफआयएच कॉंग्रेस पुढील वर्षाच्या मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यावर्षी 28 ऑक्टोबरला ही बैठक होणार होती.
बत्रा यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत हॉकी विकसित करण्याच्या उद्देशाने एफआयएचने कठोर परिश्रम घेतले आहेत. ज्या स्पर्धांची आपण मेहनतीने तयारी करत आहोत, त्यांच्यासाठी मी उत्सुक आहे.''