नवी दिल्ली - भारताचा दिग्गज हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी पंतप्रधान सहायता निधीला पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी ही माहिती दिली.
धनराज पिल्ले यांच्या आधी भारताचा बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणी यानेही या निधीसाठी सोमवारी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मोठ्या कामात लहान योगदान, असे अडवाणीने ट्विटरवर म्हटले आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी क्रीडाविश्वातील अनेक खेळाडूंनी मदतीचा हात पुढे केला आहे.