बार्सिलोना - बार्सिलोना क्लबविरुद्ध सामना म्हटल्यावर विरोधी संघाची डोकेदुखी वाढत होती. कारण लिओनेल मेस्सी त्या संघात होता. परंतु आता मेस्सीने बार्सिलोना क्लबची साथ सोडली आहे. यामुळे विरोधी संघांना बार्सिलोनाची भीती कमी झाली असल्याची कबुली बार्सिलोना एफसी क्लबचे मुख्य प्रशिक्षक रोनाल्ड कोइमन यांनी दिली.
ला लीगा स्पर्धेत बार्सिलोना क्लबचा एथलेटिक क्लबविरुद्ध सामना पार पडला. बार्सिलोनाने या सामन्यात संघर्षपूर्ण विजय मिळवत एका गुणाची कमाई केली. विशेष म्हणजे या स्पर्धेतील बार्सिलोनाचा हा दुसरा सामना आहे. यात त्यांना फक्त एक गुण मिळवता आला आहे. या सामन्यानंतर बार्सिलोनाचे प्रशिक्षक रोनाल्ड कोइमन यांनी मेस्सी गेल्याने संघावर परिणाम झाल्याची कबुली दिली.
रोनाल्ड कोइमन पत्रकार परिषदेत म्हणाले की, मी नेहमी एका गोष्टीबद्दल बोलणे पसंद करत नाही. पण आपण एका सर्वश्रेष्ठ गोष्टीबद्दल बोलत आहोत. जेव्हा मेस्सी येथे होता. तेव्हा प्रतिस्पर्धी संघाला भीती असायची. पण आता तो नाहीये. यामुळे आम्ही कल्पना आहे की आम्ही खेळात काय बदल करायला हवे.
दरम्यान, मेस्सीचा बार्सिलोनासोबतचा करार पुढे कायम राहिला नाही. या करारासाठी त्याने आपले मानधन तब्बल 50 टक्के कमी करण्याची तयारी देखील दर्शवली होती. परंतु करार मोडला. तेव्हा मेस्सीने पीएसजी सोबत दोन वर्षांचा करार केला. मेस्सी हा करार आणखी दोन वर्ष वाढवू शकतो. माध्यमाच्या वृत्तानुसार, मेस्सीची वार्षिक कमाई 35 मिलियन यूरो म्हणजे जवळपास 304 करोड रुपये इतकी आहे.
हेही वाचा - भारतीय दिग्गज फुटबॉलपटू सईद शाहिद हकिम यांचे निधन
हेही वाचा - जो रुटला 'त्या' रणणितीपासून प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूडने का रोखलं नाही, मायकल वॉनचा कडक सवाल