अॅम्स्टरडॅम - चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लेग सामन्यात टॉटेनहॅमने अयाक्सच्या घरच्या मैदानावर लुकास मोउराच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर ३-२ ने विजय मिळवत खळबळ माजवून दिली. या विजयासह टॉटेनहॅमने मोठ्या दिमाखात स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
अयाक्सने पहिल्या लेगमध्ये टॉटेनहॅमला १-० ने पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करत टॉटेनहॅमने दुसऱ्या लेगमध्ये ३-२ ने विजय मिळवत अयाक्सची पिछाडी मोडून काढली. लुकास मौउराने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर टॉटेनहॅमने पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीग स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केलाय.
चॅम्पियन्स फुटबॉल लीग स्पर्धेच्या विजेतेपदासाठी टॉटेनहॅमला आता लिव्हरपूलच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. लिव्हरपूलने बलाढ्य बार्सिलोनाचा ४-० असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत गाठली आहे.