ETV Bharat / sports

19 सप्टेंबरपासून सुरू होणार सेरी-ए लीगचा पुढचा हंगाम

सेरी-एचा 2019-20 हंगाम रविवारी संपुष्टात आला. या हंगामात जुव्हेंटसने विजेतेपद मिळवले. जुव्हेंटसने हे सलग नववे विजेतेपद मिळवले आहे. तर, इंटर मिलान संघ दुसर्‍या क्रमांकावर राहिला. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे 2019-20 चा हंगाम तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला होता.

author img

By

Published : Aug 4, 2020, 5:04 PM IST

The 2020-21 Serie A season will begin on September 19
19 सप्टेंबरपासून सुरू होणार सेरी-ए लीगचा पुढचा हंगाम

रोम - इटलीची लीग सेरी-एचा 2020-21 हंगाम यावर्षी 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर, या हंगामाची शेवटची तारीख 23 मे 2021 अशी आहे. सेरी -एच्या बहुतेक क्लब-संघांनी या तारखेबाबत सहमती दर्शवली आहे.

सेरी-एचा 2019-20 हंगाम रविवारी संपुष्टात आला. या हंगामात जुव्हेंटसने विजेतेपद मिळवले. जुव्हेंटसने हे सलग नववे विजेतेपद मिळवले आहे. तर, इंटर मिलान संघ दुसर्‍या क्रमांकावर राहिला. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे 2019-20 चा हंगाम तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला होता.

जुव्हेंटसचे नववे विजेतेपद -

सेम्पडोरियाविरूद्ध झालेल्या सामन्यात 2-0 असा विजय मिळवत जुव्हेंटसने सेरी-ए लीगचे सलग 9 वे विजेतेपद जिंकले. स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पहिल्या सत्रात गोल करत वैयक्तिक गोलसंख्या 31 अशी केली. तर, फेडरिको बर्नार्डेस्कीने 67 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत जुव्हेंटसचा विजय निश्चित केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.