मुंबई - घाटकोपर येथील आरसीटी मॉल मध्ये आज स्ट्रीट युनियन इंडियन फ्री स्टाईल फुटबॉल चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मॉलमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी आलेले सर्वजण खेळाडूंची चेंडूवरील एकाग्रता पाहून थक्क झाले. हे खेळाडू आपल्या कौशल्याने चेंडू अंगावर खेळवत होते.
हेही वाचा - अॅशेस मालिका - डेन्लीचे शतक हुकले, तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडकडे ३८२ धावांची आघाडी
लोकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे खेळाडूंचा उत्साह वाढत होता. फ्री स्टाईल फुटबॉल खेळाडू मोनीश निकम आणि आरिश अंसारी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. देशाच्या विविध भागातून ६४ खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यातील विजयी स्पर्धक हे अमेरिकेला होणाऱ्या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
घाटकोपरमध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी फ्री स्टाईलचे एका पेक्षा एक चांगले प्रदर्शन केले. एकाग्रता आणि मेहनत यातून या खेळाडूंनी फुटबॉलवर अफलातून कला सादर केल्या. इतर देशांप्रमाणे भारतात देखील या खेळाला चांगले दिवस यावेत आणि तरुणांनी या खेळाकडे आकर्षित व्हावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.