ETV Bharat / sports

धक्कादायक..! स्पॅनिश फुटबॉल क्लबच्या ३५% खेळाडूंना कोरोनाची लागण

author img

By

Published : Mar 17, 2020, 8:04 PM IST

Updated : Mar 17, 2020, 9:00 PM IST

स्पॅनिश फुटबॉल क्लब व्हॅलेंसियाने एक निवेदन जाहीर केलं आहे. त्यात त्यांनी, क्लबमधील ३५ टक्के खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं म्हटलं आहे.

Spanish Football Club Valencia Confirm 35% Of Squad Has Coronavirus
धक्कादायक..! स्पॅनिश फुटबॉल क्लबच्या ३५% खेळाडूंना कोरोनाची लागण

मुंबई - चीनमधून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा फटका क्रीडा विश्वाला बसला आहे. जगभरातील बहुतांश स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. पण, आता अनेक फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

स्पॅनिश फुटबॉल क्लब व्हॅलेंसियाने एक निवेदन जाहीर केलं आहे. त्यात त्यांनी, क्लबमधील ३५ टक्के खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं म्हटलं आहे.

  • Valencia say club have more cases of first team players/staff with coronavirus. Five announced yesterday. Now say 35 percent of those tested have the virus. All cases are asymptomatic which shows importance of staying at home even more even if feel fine pic.twitter.com/k8AvmZPCRI

    — Samuel Marsden (@samuelmarsden) March 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोनाची लागण झालेल्या सर्वांना वेगळ्या कक्षात ठेवण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आम्ही उर्वरित कर्मचारी आणि खेळाडूंना घरीच थांबण्याचे आदेश दिले असल्याचेही क्लबने निवेदनात स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, स्पेनमध्ये मंगळवारी सकाळपर्यंत ९ हजार ९४२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे स्पेनमध्ये आतापर्यंत ३४२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या धोक्यामुळे युरोपमधील सीरी ए, इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, बुंदेसलिगा आदी फुटबॉल लीग रद्द करण्यात आल्या आहेत. आज सकाळी स्पेनमधील अ‌ॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबचा प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याचा कोरोना विषाणूमुळे वयाच्या २१ व्या वर्षी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - क्रीडा क्षेत्रात कोरोनाचा पहिला बळी, २१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू

हेही वाचा - Corona Virus : ना नाणेफेक झाली, ना सामना झाला पण स्पर्धेचा विजेता ठरला

Last Updated : Mar 17, 2020, 9:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.