ETV Bharat / sports

सोशल डिस्टन्सिंगमुळे फुटबॉल संघाचा ०-३७ने पराभव

एका वृत्तानुसार, जर्मनीची लीग क्रेइस्क्लासेमध्ये १३ सप्टेंबर रोजी एसजी रिपोडोर्फ/मोल्जेन-२ विरूद्ध एसवी होलडेनस्टेड्ट-२ असा सामना खेळवण्यात आला. यात होलडेनस्टेड्टने रिपोडोर्फ/मोल्जेनचा ३७-० असा पराभव केला. होल्डेनस्टॅडने जवळजवळ प्रत्येक इतर मिनिटात गोल केले.

Social distancing costs a german football team 37-0 defeat
सोशल डिस्टन्सिंगमुळे फुटबॉल संघाचा ०-३७ ने पराभव
author img

By

Published : Sep 22, 2020, 5:34 PM IST

बर्लिन - कोरोनाच्या महामारीमुळे सोशल डिस्ट्न्सिंग हा नियम पाळणे सर्वत्र सुरु आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे आपल्या विविध संसर्ग टाळता येतात. मात्र, जर्मनीतील एका फुटबॉल संघाला सोशल डिस्टन्सिंगमुळे प्रतिस्पर्धी संघाकडून ०-३७ने पराभव स्वीकारावा लागला आहे.

जर्मनीतील एका छोट्या-स्तरीय लीगच्या फुटबॉल क्लबला सोशल डिस्टन्सिंगचे अनुसरण करावे लागले. या क्लबने आपले सातही खेळाडू मैदानात उभे केले, जेणेकरुन ते सामाजिक अंतराचे अनुसरण करू शकतील आणि कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखू शकतील.

एका वृत्तानुसार, जर्मनीची लीग क्रेइस्क्लासेमध्ये १३ सप्टेंबर रोजी एसजी रिपोडोर्फ/मोल्जेन-२ विरूद्ध एसवी होल्डेनस्टॅड-२ असा सामना खेळवण्यात आला. यात होल्डेनस्टॅडने रिपोडोर्फ/मोल्जेनचा ३७-० असा पराभव केला. होल्डेनस्टॅडने जवळजवळ प्रत्येक इतर मिनिटात गोल केले.

खरे तर सामना सुरू होण्यापूर्वी रिपोडोर्फ संघाला होल्डेनस्टॅडचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे कळले. मात्र, होल्डनस्टॅडचा संपूर्ण संघ या चाचणीत निगेटिव्ह आला. मात्र, रिपोडोर्फच्या खेळाडूंना हा सामना खेळणे सुरक्षित वाटत नव्हते. त्यांनी हा सामना पुढे ढकलण्यास सांगितले. संसर्गाच्या भीतीमुळे बर्‍याच खेळाडूंना मैदानावर येण्याची इच्छा नव्हती. म्हणून रिपोडोर्फमधील फक्त सात खेळाडू मैदानात उतरले.

रिपोडोर्फचे सह-अध्यक्ष पॅट्रिक रिस्तो म्हणाले, ''आम्ही सामना पुढे ढकलण्यास सांगितले, पण होल्डनस्टॅडला खेळायचे होते. सामना सुरू होताच आमच्या खेळाडूने चेंडू पास केला आणि आमचा संघ एका बाजूला उभा राहिला.''

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.