माद्रिद - रियल माद्रिदचा मिडफिल्डर टोनी क्रूसला कोरोनाची लागण झाली आहे. रियल माद्रिद क्लबने यांची पृष्टी दिली. रियल माद्रिद क्लबने सांगितलं की, ला लिगा लीगच्या या हंगामातील अखेरच्या निर्णायक सामन्याला क्रूस मुकला आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, क्रूस शुक्रवारी त्यांच्या घरी क्वारंटाईन झाला आहे.
दरम्यान, क्रूस रियल माद्रिद क्लबचा कोरोनाग्रस्त होणारा नववा खेळाडू ठरला आहे. याआधी एडर मिलिटाओ, कासेमिरो, नाचो फर्नांडीज, राफेल वराने, सार्जियो रामोस, फेडे वाल्वरडे, लुका जोविकसह आणखी एक जणांना कोरोनाची लागण झाली होती.
रियल माद्रिदचे प्रशिक्षक जिनोदिन जिदान तसेच क्लबचे अध्यक्ष फ्लोरेंटिनो पेरेज यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
क्रूस या हंगामात रियल माद्रिदचा महत्वपूर्ण खेळाडू ठरला आहे. त्याने सर्व स्पर्धांमधील ४२ सामन्यात ३ हजार १९४ मिनिटे मैदानात घालवली आहेत. यात त्याने ३ गोल तर १२ असिस्ट केले आहेत.
हेही वाचा - बार्सिलोना महिला संघाने रचला इतिहास, पहिल्यांदा जिंकली वूमन्स चॅम्पियन लीग
हेही वाचा - मँचेस्टर सिटीने १०वर्षांत पटकावलं ५व्यांदा प्रीमियर लीगचे विजेतेपद