ETV Bharat / sports

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरला कोरोनाची लागण - कतार विश्वचषक स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आदिल खामिसला कोरोनाची लागण

कोरोना विषाणूने संपूर्ण क्रीडाविश्वावर आपला विळखा घातला असून फुटबॉल विश्वातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कतार विश्वचषक स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेला माजी फुटबॉलटू आदिल खामिस याला कोरोनाची लागण झाली आहे.

qatar fifa world cup 2022 ambassador adel khamis tests positive for coronavirus
फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरला कोरोनाची लागण
author img

By

Published : May 2, 2020, 9:38 AM IST

दोहा - कोरोना विषाणूने संपूर्ण क्रीडाविश्वावर आपला विळखा घातला असून फुटबॉल विश्वातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कतार विश्वचषक स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेला माजी फुटबॉलटू आदिल खामिस याला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती स्पर्धेच्या आयोजन समितीने दिली.

नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ साली कतारमध्ये फीफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा होणार आहे. याआधी कतारकडून स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. याआधी स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असलेल्या ३ स्टेडियमच्या ८ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तरीही फिफा विश्वचषक स्पर्धेच्या तयारीची कामे अद्यापही सुरू आहेत.

या सर्व घडामोडीत आदिल खामिस (५४) याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आदिल कतारचा स्टार फुटबॉलपटू असून, त्याने वयाच्या १८ व्या वर्षीच कतारकडून आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. १९८३ साली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या आदिलने २००० साली निवृत्ती घेतली होती. त्याने सुदानविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

दरम्यान, कतारमध्ये गुरूवारपर्यंत कोरोनाचे १३ हजार ४०९ रुग्ण आढळून आले आहेत. यात १३७२ रुग्ण यातून बरे झाले आहेत. तर १० लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. क्रीडा जगतातून कोरोनामुळे आजघडीपर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटर जफर सर्फराज, स्वित्झर्लंडचे दिग्गज आईस हॉकीपटू रॉजर चॅप्पोट, स्पेनमधील फुटबॉल संघाचा प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया, पाकिस्तानचे दिग्गज स्क्वॅश खेळाडू आजम खान, इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट संघाचे अध्यक्ष डेव्हिड हॉजकिस, फ्रान्सच्या ऑलिम्पिक डी मार्शल फुटबॉल क्लबचे माजी अध्यक्ष पेप दिऑफ आणि इटलीचे प्रसिद्ध ऑलिम्पिक धावपटू दोनातो साबिया यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

हेही वाचा - जगभरातील ५० दिग्गज फुटबॉलपटूंची ‘मानवते’च्या नायकांना मानवंदना

हेही वाचा - रोनाल्डोच्या फुटबॉलपटू मित्राची कोरोना टेस्ट चौथ्यांदा पॉझिटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.