नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहन बागान फुटबॉल क्लबचे आय-लीग चषक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. "आय-लीग जिंकल्याबद्दल मोहन बागानचे खेळाडू, कर्मचारी आणि चाहत्यांचे अभिनंदन. हा एक उत्तम उत्सव आहे", असे पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे.
कोलकाता येथील सिटी हॉटेल क्लबमध्ये रविवारी आय-लीग २०१९-२० हंगामासाठीची ट्रॉफी क्लबला सादर करण्यात आली. यावेळी पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास आणि आय-लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनंडो धर हे देखील उपस्थित होते. मोहन बागानने १० मार्च रोजी आयझोलला १-०ने पराभूत करून विजेतेपद जिंकले आहे.
-
Congratulations to the players, staff and fans of the illustrious @Mohun_Bagan for emerging as @ILeagueOfficial Champions! Indeed, a joyful occasion. #Champion5
— Narendra Modi (@narendramodi) October 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congratulations to the players, staff and fans of the illustrious @Mohun_Bagan for emerging as @ILeagueOfficial Champions! Indeed, a joyful occasion. #Champion5
— Narendra Modi (@narendramodi) October 18, 2020Congratulations to the players, staff and fans of the illustrious @Mohun_Bagan for emerging as @ILeagueOfficial Champions! Indeed, a joyful occasion. #Champion5
— Narendra Modi (@narendramodi) October 18, 2020
तीन वेळा आयएसएल चॅम्पियन एटीके आणि आय-लीगचा विजेता मोहन बागान यावर्षी जानेवारीत एकत्र आले होते. एटीकेचे मालक संजीव गोयंका यांनी मोहन बागानची ८० टक्के भागीदारी विकत घेतली आहे. क्लबचे नाव एटीके मोहन बागान असे बदलण्यात आले. तर लोगोमध्ये मोहन बागानची ओळख असलेल्या 'बोट'वर 'एटीके' हा शब्द लिहिण्यात आला आहे.