ETV Bharat / sports

विश्वकप पात्रता फेरी प्रकरणात अर्जेंटिनाच्या 4 फुटबॉलपटूंची पोलिसांकडून चौकशी

author img

By

Published : Sep 7, 2021, 7:14 PM IST

ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यात विश्वकप पात्रता फेरीतील सामना खेळवला जात होता. कोरोना प्रोटोकॉल मोडल्याचे सांगत पोलिसांनी हा सामना रोखला होता. या प्रकरणात अर्जेंटिनाच्या 4 फुटबॉलपटूंची चौकशी ब्राझील पोलीस करत आहेत.

police-is-investigating-four-argentine-footballers-regarding-the-world-cup-qualifier-case
विश्वकप पात्रता फेरी प्रकरणात अर्जेंटिनाच्या 4 फुटबॉलपटूंचा पोलिसांकडून तपास सुरू

साओ पाउलो - अर्जेंटिनाचे फुटबॉलपटू एमिलियानो मार्तिनेज, एमिलियानो ब्यूंडिया, जियोवान्नी लो सेस्सो आणि क्रिस्टियन रोमेरो यांच्यावर ब्राझील देशाचा कोरोना प्रोटोकॉल मोडल्याचा आरोप आहे. यामुळे या चार फुटबॉलपटूंची चौकशी ब्राझील फेडरल पोलीस करत आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण -

ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यात विश्वकप स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामना आयोजित होता. या स्पर्धेसाठी अर्जेंटिनाचे चार खेळाडू जे इंग्लंडमध्ये वास्तवाला होते, त्यांचा देखील अर्जेंटिना संघात समावेश होता. पण ब्राझील देशाच्या कोरोना प्रोटोकॉल प्रमाणे त्या चार खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक होते. परंतु यातील तिघे ब्राझीलविरुद्धचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. तेव्हा स्थानिक पोलिसांनी थेट मैदानावर धाव घेत चालू सामना थांबवला.

आता या प्रकरणात चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. ब्राझील फेडरल पोलिसांनी सोमवारी सांगितलं की, त्या चार फुटबॉलपटूंना लेखी द्यावे लागेल. तेव्हाच त्यांना अर्जेंटिना संघासोबत रवाना होण्याची परवानगी मिळेल.

आरोग्य एजन्सी अनविसाचे निदेशक एलेक्स काम्पोस यांनी सांगितलं की, अर्जेंटिनाने त्यांचा सल्ला ऐकला नाही. आम्ही त्या खेळाडूंना आल्या दिवशीच परत इंग्लंडला पाठवू शकलो असतो. पण आम्ही त्यांना क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे, हा सल्ला आम्ही त्यांना अनेक वेळा दिला. पण रविवारी ते सामना खेळताना दिसले. आम्ही सामना थांबवू इच्छित नव्हतो. पण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ते ब्राझीलच्या नियमांना आव्हान देत होते आणि त्यांना याचे सडेतोड उत्तर मिळायला हवे.

दरम्यान, फीफाने देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पण यावर कधी निर्णय घेतला जाईल. याची अद्याप स्पष्टता नाही.

हेही वाचा - India vs England : विराट कोहलीने केलं गोलंदाजांचे तोंडभरून कौतुक, म्हणाला...

हेही वाचा - रोहन बोपण्णा-इवान डोडिगचा तिसऱ्या फेरीत पराभव, यूएस ओपनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.