पॅरिस - फ्रान्सचा फुटबॉल क्लब आणि फ्रेंच लीग-1 चा विजेता क्लब पॅरिस सेंट जर्मेनने (पीएसजी) या मोसमातील दुसरी ट्रॉफी आपल्या नावावर केली. अंतिम सामन्यात पीएसजीने सेंट एटिनला 1-0 ने पराभूत करून विजेतेपद पटकावले. मात्र, या सामन्यात विजेत्या संघाचा स्टार खेळाडू, किलियन एम्बाप्पे जखमी झाला. एका वृत्तानुसार, सामन्यादरम्यान फ्रान्सचा वर्ल्डकप विजेत्या संघाचा फुटबॉलपटू एम्बाप्पे आणि एटिनचा कर्णधार लोईक पेरिन यांच्यात धडक झाली. या धडकेमुळे एम्बाप्पेच्या पायाला दुखापत झाली.
-
PSG lift the French Cup for the 13th time in their history 🏆 pic.twitter.com/nQInFVKUnP
— B/R Football (@brfootball) July 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PSG lift the French Cup for the 13th time in their history 🏆 pic.twitter.com/nQInFVKUnP
— B/R Football (@brfootball) July 24, 2020PSG lift the French Cup for the 13th time in their history 🏆 pic.twitter.com/nQInFVKUnP
— B/R Football (@brfootball) July 24, 2020
पेरिनच्या चुकीमुळे दोन्ही संघातील खेळाडू आपसात भिडले. त्यानंतर एम्बाप्पेला मैदान सोडून बाहेर जावे लागले. एटिनेमध्ये 17 वर्षे घालवल्यानंतर पेरिन आपला शेवटचा सामना खेळत होता.
-
Rough tackle on Mbappe, two weeks to UCL game against Atalanta FC. #Mbappe #psg pic.twitter.com/GTWZ5UJHQe
— Sportsinjuries (@Sportsinjurie10) July 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Rough tackle on Mbappe, two weeks to UCL game against Atalanta FC. #Mbappe #psg pic.twitter.com/GTWZ5UJHQe
— Sportsinjuries (@Sportsinjurie10) July 24, 2020Rough tackle on Mbappe, two weeks to UCL game against Atalanta FC. #Mbappe #psg pic.twitter.com/GTWZ5UJHQe
— Sportsinjuries (@Sportsinjurie10) July 24, 2020
पॅरिस सेंट जर्मेनकडून 14 व्या मिनिटाला ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने सामन्यात एकमेव गोल केला. प्रेक्षकांच्या उपस्थितीत युरोपमध्ये खेळलेला हा पहिला स्पर्धात्मक सामना होता. 80 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये पाच हजार लोक उपस्थित होते. सामना सुरू होण्यापूर्वी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनदेखील स्टेडियमवर हजर होते.